‘शक्तीपीठ’ महामार्गाचा सिंधुदुर्गला फायदा होईल – नितेश राणे

 



 जिल्ह्याला जास्तीत जास्त फायदा होईल, अशाच पद्धतीने आराखडा तयार केला जात आहे.”

 


सिंधुदुर्ग : नियोजित ‘शक्तीपीठ’ महामार्गाचा आराखडा तयार करताना सिंधुदुर्ग जिल्ह्याला निश्चितपणे फायदा होईल, याची काळजी घेतली जाईल, असे स्पष्ट मत जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले. गेल्या काही दिवसांपासून या महामार्गाच्या आराखड्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही भूमिका मांडली.

या प्रकल्पाबाबत विरोधकांकडून सातत्याने टीका होत असून “या महामार्गाचा सिंधुदुर्गला नेमका काय फायदा?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावर उत्तर देताना राणे म्हणाले,

तसेच, या महामार्गामुळे स्थानिक गावांना कोणतीही हानी होणार नाही, याचीही खबरदारी घेतली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बांदा आणि इतर गावांवर परिणाम होऊ नये यासाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला असून रेडी-भद्रा परिसरालाही या महामार्गाशी जोडण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी या महामार्गाचा आराखडा बदलून तो कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी मार्गे सिंधुदुर्गात आणण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना निवेदन सादर केले.

पारकर यांनी म्हटले आहे की, राधानगरी ते सिंधुदुर्ग हे अंतर केवळ 30 ते 40 किलोमीटर असल्याने या मार्गामुळे पर्यटनाला चालना मिळू शकते. तसेच हा महामार्ग मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 ला थेट जोडावा किंवा सह्याद्रीच्या पायथ्याशी ग्रीनफिल्ड संकल्पनेतून पर्यायी मार्ग विकसित करावा, अशीही सूचना त्यांनी केली.

दरम्यान, या महामार्गाला ठाकरे गटाच्या शिवसेनेने तीव्र विरोध दर्शवला आहे. माजी आमदार आणि जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी इशारा देत म्हटले की, हा प्रकल्प कोकणवासीयांच्या हिताचा नसेल, तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू. महामार्गामुळे कोकणातील व्यापार आणि पर्यटनावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असा आरोप करत त्यांनी सरकारने याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी केली आहे.

या महामार्गामुळे कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यांतील गावांचा विकास होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दळणवळण सुधारल्याने स्थानिक उद्योगांना चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधी वाढतील, असा विश्वास स्थानिक प्रतिनिधींनी व्यक्त केला आहे.

#Shaktipeeth Highway#Sindhudurg News#Nitesh Rane#Sindhudurg Development#Maharashtra Highway Project

Post a Comment

Previous Post Next Post