डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन



नागरिकांच्या डोळ्यांची मोफत तपासणी 

डोंबिवली / शंकर जाधव :   १४ एप्रिल भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डोंबिवली पूर्वेकडील शेलार नाका येथील भाजप माजी नगरसेवक साई शेलार यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून  अभिवादन करण्यात आले.

यावेळी भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष  शशिकांत कांबळे,माजी नगरसेवक  साई शेलार,  डोंबिवली शहर सचिव राजु शेख, कपिलदेव शर्मा, रुपेश पवार, कृष्णा गट्टू आदींसह अनेकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. या दिवशी येथील नागरिकांच्या डोळ्यांची मोफत तपासणी करण्यात आली.



Post a Comment

Previous Post Next Post