नव्या ५०० मिमी पाणी पाइपलाइनचा शुभारंभ
दिवा \ आरती परब : देसाई ते पडले परिसरातील जीर्ण व वारंवार बिघाड होणारी जुनी पाणीपुरवठा लाईन काढून टाकत ठाणे महानगरपालिकेमार्फत नव्या पाइपलाइन टाकण्याच्या कामास आज शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
स्थानिक आमदार राजेश मोरे आणि शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या सहकार्याने क्रोमा शोरूमसमोर, देसाई नाका येथे ५०० मिमी व्यासाची नवीन पाइपलाइन टाकण्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. या कामामुळे देसाई, पडले व खिडकाळी परिसरातील नागरिकांना भेडसावणारी पाणीटंचाई लवकरच दूर होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उद्घाटन प्रसंगी नगरसेवक बाबाजी बाळाराम पाटील, नगरसेविका अर्चना निलेश पाटील, नगरसेविका वेदिका साहिल पाटील यांच्यासह पालिका पाणी विभागाचे अभियंते सुरेश वाघीरे, विभागप्रमुख विष्णू कोटकर, उपविभाग प्रमुख दीपेश पाटील, तसेच मधुकर पाटील, बाळाराम पाटील, साहिल पाटील, विनायक पाटील, राकेश पाटील आणि शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रकल्पामुळे परिसरातील पाणीपुरवठा अधिक सुरळीत व नियमित होईल, असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.

