दिवा शहरात शिवसेनेच्या महाआरतीला महिलांचा ऐतिहासिक प्रतिसाद

 



दिवा / आरती मुळीक परब: ​महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोध्या नगरीत श्री राम प्रभूंचे दर्शन घेऊन शरयू नदीच्या तीरावर महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी महाआरती केली. त्याच पार्श्वभूमीवर दिवा शहरात देखील खासदार डॉ.​ ​श्रीकांत शिंदे व शिवसेना शहर प्रमुख,  ​उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या मार्गदर्शनाखाली​ माजी​ नगरसेविका दर्शना म्हात्रे व​ ​शहर अधिकारी,​ युवती सेना दिवा शहर साक्षी रमाकांत मढवी यांनी दिवा शहराच्या समृद्धी आणि प्रगतीसाठी महाआरतीतचे आयोजन केले होते.

दिवा शहरातील दातीवली तलावाजवळ संपन्न झालेल्या या महाआरतीला दिवावासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हजारो महिलांनी स्वतः आरतीचे ताट हातात घेऊन सामूहिक महाआरतीत सहभाग नोंदवला.​ ​महाराष्ट्रचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आयोध्या दौऱ्यात दिवा शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी, ​माजी ​नगरसेवक व कार्यकर्ते सहभागी झाले ​असून दिव्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत महाआरती यशस्वी करण्याचे ​आव्हान महिला कार्यकर्त्यांवर असताना त्यांनी ही जवाबदारी लीलया पे​लली असल्याचे आरतीला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने दिसून आले​. ​​अन् खऱ्या अर्थाने ही महाआरती ऐतिहासिक झाली असल्याची भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली.

यावेळी​ माजी​ नगरसेविका दर्शना म्हात्रे, सुनीता मुंडे, दिपाली उमेश भगत, ​​शहर अधिकारी, युवती सेना साक्षी मढवी, अर्चना पाटील, ॲड.​ ​सुप्रिया भगत​, सरिता रमाकांत मढवी, सुविता मढवी, प्रतिमा मढवी, देवयानी मुंडे, सिध्दी मढवी​ आदी महिला कार्यकर्त्या आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिवा शहरातील हजारो महिलांनी ऐतिहासिक महाआरतीत सहभाग नोंदवल्याबद्दल आभार ​- दर्शना म्हात्रे,​ माजी​ नगरसेविका

शिवसेना आणि दिवावासीयांच एक अतूट नाते आहे. दिवा शहराच्या प्रगती आणि समृद्धीसाठी संपन्न झालेल्या महाआरतीत प्रचंड संख्येने सहभागी होऊन दिवावासीयांनी ते दाखवून दिलं. सर्व नगरसेवक, मुख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या गैरहजेरीत हा कार्यक्रम होत असल्यामुळे खूप दडपण वाटत होतं. परंतु नागरिकांनी, विशेषतः आमच्या महिला वर्गाने जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्याचे मनापासून आभार व्यक्त करते. 

- साक्षी रमाकांत मढवी, 

शहर अधिकारी, युवती सेना, दिवा शहर​

Post a Comment

Previous Post Next Post