दिव्यातील नाले तुडुंब भरलेले!
दिवा / आरती मुळीक परब: दिवा शहरातील सर्वच नाले कचरा, गवत, प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या व गाळाने तुडूंब भरलेले असून हे नाले पावसाळ्याआधी साफ होणे गरजेचे आहे. दरवर्षी दिवा शहरातील नाले मे महिन्यात साफ करण्यास सुरुवात होत असल्याने सदर नाले खोलवर साफ होत नाहीत. परिणामी शहरात अनेक भागात पाणी साचण्याचे प्रकार घडतात.
दिव्यात बेडेकर नगरचा नाला, रिलाईन्सचा टॉवर नाला, तिसाई नगरचा नाला, दातिवली रोड नाला, वक्रतुंड नगरचा नाला, मुंब्रा देवी रोड नाला, ग्लोबल इंग्लीश शाळेजवळचा नाला असे हे सात मुख्य नाले आहेत. ह्या नाल्यांमध्ये नागरिकांनी क
तसेच दरवर्षी नालेसफाईत हात सफाई केली जाते, असे विरोधकांचे मत आहे. काही नाल्यांमध्ये गवत रुजले असल्याने त्या नाल्यांत मोठ्या प्रमाणात गाळ असल्याचे स्पष्ट दिसते आहे. तरीही हे नाले नीट साफ होत नाहीत अशी चर्चा नागरिकांत होत आहे.
रमाकांत मढवी, माजी उपमहापौर, ठाणे- गेल्या तीन दिवसांपूर्वीच नालेसफाईसाठी दिव्यातील सर्व नाल्यांची पाहणी केलेली आहे. त्यानुसार निविदा ही भरलेल्या आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच नालेसफाईला सुरुवात करु. जेणेकरुन दिव्यात पाणी तुंबणार नाही.
डोंगर नारायण परदेशी, उप स्वच्छता निरिक्षक, दिवा प्रभाग समिती, ठामपा - निविदा प्रकिया झाल्यावर लगेचच नालेसफाई हातात घेतली जाते. तसेच ठामपाच्या नालेसफाईच्या डेडलाईन पर्यंत दिव्यात संपूर्ण नालेसफाई केली जाते.
