डोंबिवली / शंकर जाधव : महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण व 'डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार' या संस्थेच्या माध्यमातून ईगल ब्रिगेड फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ बिवलकर यांना 'आदर्श डोंबिवलीकर विशेष दखल' प्रदान करून गौरविण्यात आले.
डोंबिवली पूर्वेकडील आप्पा दातार चौकात हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.यावेळी बिवलकर म्हणाले, आपल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन पुरस्कार प्रदान करून सन्मानित केल्याबद्दल मंत्री चव्हाण, डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि सर्व डोंबिवलीकरांचे आभार मानतो.
Tags
महाराष्ट्र