मध्य रेल्वे इन्स्टिट्यूट - दादर निवडणुकीत NRMUचा एकहाती विजय





 सहा संघटनांच्या महायुतीचा पराभव, मध्य रेल्वेतील अनेक ठिकाणी एकछत्री सत्ता

मुंबई / आरती परब : मध्य रेल्वे इन्स्टिट्यूट – दादर येथे पार पडलेल्या द्विवार्षिक निवडणुकीत नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने (NRMU) प्रचंड मताधिक्याने एकतर्फी विजय मिळवत पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली आहे. तब्बल सहा संघटनांच्या महायुतीविरुद्ध लढत देत NRMU ने भरघोस मतांनी बाजी मारत दादर इन्स्टिट्यूटवरील सत्ता एकहाती काबीज केली. या निवडणुकीत सिआएमएस, रेल कामगार सेना, महाराष्ट्र नवनिर्माण रेल कामगार सेना, रेल मजदूर युनियन आणि मध्य रेल कामगार संघ यांच्या महायुतीचा सामना करताना NRMU ने महायुक्तीलाही निर्णायक पराभव स्वीकारायला भाग पाडले.

एकूण मतदान ९०४ झाले असून त्यापैकी NRMU पॅनलला तब्बल ६९३ मते मिळाली. दादर इन्स्टिट्यूट मतमोजणीत सचिवपदी कॉम. चेतन सवाल (७३०) तर खजिनदारपदी कॉम. विनय सावंत (७१४ निवडून आले. सदस्य म्हणून कॉम. दीपक पाटील (७३९), कॉम. प्रतिज्ञा सावंत (७३३ ), कॉम. रॉयस्टन मायकल (७२९ ), कॉम. प्रशांत पेडणेकर (७२७ ), कॉम. विक्रम म्हात्रे (७२५ ), कॉम. सिकंदरजीत सिंह (७२३ ) आणि कॉम. महेश खैरे (७२० ) यांची निवड झाली.

दादर इन्स्टिट्यूटसोबतच नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने कॉम. वेणू पी. नायर (महामंत्री) यांच्या नेतृत्वाखाली मध्य रेल्वेतील कुर्ला, ठाणे, कल्याण, इगतपुरी आणि लोणावळा या प्रमुख ठिकाणीही महायुतीचा पराभव करून एकछत्री सत्ता प्रस्थापित केली आहे. या सलग आणि दणदणीत विजयानंतर मध्य रेल्वेमधील NRMUची पकड अधिकाधिक मजबूत झाल्याचे आनंददायी वातावरण रेल्वे कामगार वर्गात पाहायला मिळत आहे.




Post a Comment

Previous Post Next Post