स्वयंघोषित कार्यसम्राट हटवा दिवा वाचवा
दिवा \ आरती परब : दिव्यात वाढते फेरीवाले त्यामुळे होणारी वाहतूक कोंडीने दिवेकर त्रस्त झाल्याने दिव्यात अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात प्रत्येक पक्ष आवाज उठवत आहे...! मग, स्वयंघोषित कार्यसम्राटच मूग गिळून गप्प का ???? असा प्रश्न उपस्थिती करत नाव न घेता शिंदेच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवक आणि उपशहर प्रमुख यांना डीवचत भाजपाने बॅनर लावत टार्गेट केले आहे.
संपूर्ण दिव्यात रस्त्यावर बसणाऱ्या प्रत्येक फेरीवाल्याकडून ५० रुपये प्रत्येकी घेतले जातात, असा आरोप भाजपच्या पदाधिकारी यांनी केला. दिव्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या फेरीवाल्यांमुळे शहरात वाहतूककोंडी जास्त प्रमाणात होत आहे. दिवाळीत तर या फेरीवाल्यांमुळे रेल्वेसुद्धा १० ते १५ खोळंबली होती. त्यामुळे दिवेकरांसोबत इतर स्थानकांचे प्रवासी ही त्रस्त झाले होते. याला वैतागुनच भाजपने स्वयंघोषित कार्यसम्राट हटवा दिवा वाचवा अशी खोचक बॅनरबाजी केली आहे.
तर आगामी पालिकेच्या निवडणुकीच्या पार्शभूमीवर भाजप पदाधिकारी यांनी शिंदेच्या शिवसेने डीवचत सांगितले की ठाणे महापालिकेत महायुतीचा महापौर बसवा पण तो भारतीय जनता पार्टीचा असावां, असे भाजप दिवा शहर मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांनी सांगितले.
