भाजप दिवा मंडळ महिला मोर्चातर्फे आयुष्मान कार्ड शिबिराचे आयोजन





महिलांसाठी मोफत मॅमोग्राफी शिबिर 


दिवा \ आरती परब : भारतीय जनता पार्टी दिवा मंडळ महिला मोर्चा तर्फे आणि ठाणे महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहकार्याने महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत “ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस व मोफत मॅमोग्राफी शिबिर तसेच आयुष्मान कार्ड शिबिर” आयोजित करण्यात आले आहे.


सदर शिबिर दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असून दिव्यातील आगासन गावाच्या दत्त मंदिराजवळ महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सेवेचा लाभ घेतला. या शिबिरात महिलांना स्तन कर्करोगा बाबत जनजागृती करुन त्यांची आवश्यक तपासणीसह मोफत मॅमोग्राफी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच पात्र लाभार्थ्यांसाठी आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आरोग्य विमा कार्ड तयार करुन देण्यात आले आहे.



या उपक्रमाचे आयोजन महिला मोर्चाच्या अध्यक्षा सपना रोशन भगत यांच्या पुढाकाराने करण्यात आले असून, भाजप ठाणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य व संयोजक रोशन भगत आणि दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम राबविण्यात आला आहे. महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढावी, कर्करोगासारख्या आजारांचे लवकर निदान व्हावे आणि गरीब व गरजू महिलांना मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात, हा या शिबिराचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. दिवा परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतला.


त्यावेळी भारतीय जनता पार्टी दिवा शीळ मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, दिवा शीळ मंडळ उपाध्यक्ष नितीन कोरगावकर, ठाणे जिल्हा ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष विनोद दादा भगत, ठाणे जिल्हा सुधीर म्हात्रे, प्रवीण पाटील, कार्यकारणी सदस्य रेश्मा पवार, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष विजय भोईर, ठाणे जिल्हा कार्यकारणी सदस्य जिलाजीत तिवारी, उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष अशोक गुप्ता, सोशल मीडिया प्रमुख विठ्ठल गावडे, अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष विजय वाघ तसेच राकेश पंडित, प्रकाश पाटील, गणेश सावंत, प्रवीण पाटील, दिनेश जाधव, आगरी महिला शक्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा उषा मुंडे तसेच सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी महिला मोर्चा दिवा मंडळचे सर्व महिला उपस्थित होते.




Post a Comment

Previous Post Next Post