दिवा स्टेशन परिसरात नवीन शौचालय

 

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने गैरसोय दूर

दिवा / आरती मुळीक परब:  चार ते पाच लाख लोकसंख्येच्या दिवा शहरात ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून १४ ते १५ सार्वजनिक शौचालय यापूर्वीच उभारलेली आहेत. यामधील काही शौचालयांची वापराविना दुरवस्था झालेली आहे. दिवा रेल्वे स्टेशन परिसरात सार्वजनिक शौचालय नसल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत होती. विशेषतः महिला वर्गाला मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. दिवा स्टेशन परिसरात सार्वजनिक शौचालय नसल्याने नागरिकांना बहुतांशी वेळी रेल्वेच्या शौचालयावर अवलंबून राहावं लागत होते. ठाणे महानगर पालिकेतर्फे दिवा विभागात इतर ठिकाणी शौचालय असले तरी नवीन ठिकाणी शौचालय बांधण्यासाठी जागेची आवश्यकता असल्यामुळे नव्याने नवीन शौचालय बांधणे महापालिकेला शक्य होत नव्हते. शिवसेना शहरप्रमुख, मा.उपमहापौर रमाकांत मढवी व इतर नगरसेवकांच्या माध्यमातून काही महिन्यापूर्वीच दिवा आगासन रोडला दोन सीट असलेलं सार्वजनिक शौचालय उभारण्यात आलं होतं. स्टेशन परिसरात जागा उपलब्ध नसल्यामुळे महापालिकेला इच्छा असताना सुद्धा येथे शौचालय उभारता आलेले नव्हतं. नुकत्याच झालेल्या रस्ता रुंदीकरणामुळे तयार झालेल्या नवीन जागेत दिवेकर नागरिकांसाठी शौचालय सार्वजनिक शौचालय उभाराव यासाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी उपमहापौर रमाकांत मढवी व इतर नगरसेवकांच्या प्रयत्नाने नवीन शौचालय उभारण्यासाठी ठाणे महानगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला जात होता. 

खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने अखेर लहुजी साळवे सामाजिक संस्था व ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्तपणे सार्वजनिक शौचालय उभारण्याच्या कामाला मंजुरी मिळाल्यानंतर अखेर दिवा स्टेशन रोडवर सार्वजनिक शौचालय उभारण्यात आलेलं आहे. या शौचालयाचे उद्घाटन नुकतचं माजी उपमहापौर, शिवसेना शहर प्रमुख रमाकांत मढवी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी उद्घाटन प्रसंगी रमाकांत मढवी यांनी सांगितले की, स्टेशन परिसरात जागा उपलब्ध नसल्यामुळे सार्वजनिक शौचालय उभारण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या, रस्ता रुंदीकरण झाल्यानंतर स्टेशन परिसरात सार्वजनिक शौचालय उभारण्याचा मार्ग मोकळा झाला.     

ठाणे महानगरपालिका आणि सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने आज सेशन परिसरात नवीन शौचालयाचे लोकार्पण झालं आहे. तसेच येणाऱ्या काळात स्टेशन परिसरात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने आणखी एक सार्वजनिक शौचालय उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक शैलेश पाटील, अमर पाटील, माजी नगरसेविका दिपाली उमेश भगत, उपशहर प्रमुख अँड.आदेश भगत, विभाग प्रमुख उमेश भगत, निलेश पाटील, गुरुनाथ पाटील, भालचंद्र भगत, उपविभाग प्रमुख भूषण म्हात्रे, समीर पाटील, शाखाप्रमुख संतोष हळदणकर, भरत शिंत्रे, प्रदीप पाटील, दिगंबर भोईर आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post