डोंबिवली पश्चिमेकडील गोपीनाथ चौकातील घटना
इमारतीतील रहिवाशांच्या सतर्कतेमुळे वाचले घर
डोंबिवली /शंकर जाधव : डोंबिवली पश्चिमेकडील देवीचापाडा येथील गोपीनाथ चौकातील मेलेनियम आर्केट इमारतीत पहिल्या मजल्यावरील अनिल पंडितराव खांकरी यांच्या घरी शुक्रवारी रात्री साड़े आठ वाजण्याच्या सुमारास अचानक घराला आग लागल्याची घटना घडली. घरात एकूण पाच सदस्य असून आई वडील व मुलगा गावाला गेले होते.तर घरात मोठा मुलगा आणि त्याची पत्नी असते.शॉर्टसर्किट मुळे घराला आग लागली तेव्हा मुलगा कामावर होता तर त्याची पत्नी मार्केट ला गेली होती.याच इमारतीत अनिल प्रकाश भोईर यांनी सतर्कता दाखवीत अग्निशामक दलाला फोन केला.तात्काळ अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. घर बंद असल्याने अग्निशमक दलाच्या जवानांनी रस्त्याच्या बाजूने पहिल्या मजल्यावरती गॅलरीमध्ये चढूनकाही वेळातच आगीवर नियंत्रण आणले.