शिवाई बालक मंदीर शाळेत यावर्षीही मुलींनीच बाजी
डोंबिवली / शंकर जाधव : दहावीच्या निकालाची वात पाहत असलेल्या विद्यार्थ्याना मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.डोंबिवलीतील सिस्टर निवेदिता, सेंट जोसेफ हायस्कूल, ओमकार इंटरनॅशनल शाळा, शिवाई बालक मंदिर शाळेचा १०० टक्के निकाल लागला आहे.डोंबिवली शहरातील ४७ वर्ष जुनी असणाऱ्या डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिस्टर निवेदिता शाळेने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपल्या घवघवीत यशाची परंपरा जपली आहे. या शाळेचा १०० टक्के निकाल लागला आहे. या शाळेतील वैद्यही शेटे या विद्यार्थ्याने १०० पैकी १०० गुण मिळवून शाळेचे आणि डोंबिवली शहराचे नाव उंचावले आहे. शिवाई बालक मंदीर शाळेत यावर्षीही मुलींनीच बाजी मारली.
वैद्यही शेटे या विद्यार्थ्याने १०० पैकी १०० गुण मिळाल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.सिस्टर निवेदिता शाळेने मिळविलेल्या या घवघवीत यशात प्रभाकर देसाई यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहनात सिंहाचा वाटा आहे. वैद्यही शेटेचे शाळेकडून कौतुक होत आहे.डोंबिवली पूर्वेकडील मिलापनगर येथील सेंट जोसेफ हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला.या शाळेतील पूर्वा विशाल शेटे हिला दहावीत ७० टक्के गुण मिळाले. पूर्वा हिचे वडील समाजसेवक आहेत.शिवाई बालक मंदिर ट्रस्ट संचालित शिवाई बालक मंदीर शाळेने १०० टक्के निकालाची परंपरा कायम कायम ठेवली आहे.यावर्षीहि या शाळेत मुलींनीच बाजी मारली. या शाळेतील प्रथम क्रमांक साक्षी कृष्णा पडोळ ( ९३.६० टक्के ), दुसरा क्रमांक अदिती अनंत बेंडल ( ९१.२० ) आणि तिसरा क्रमांक श्रद्धा गणेश शिंदे ( ८९.४५ ) यांना मिळाला. या शाळेत एकूण ९५ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत बसले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. डोंबिवलीतील सर्वात पहिली शाळा असलेल्या स.वा. जोशी शाळेचा ९७.३२ टक्के निकाल लागला. या शाळेत एकूण ११२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाळेत प्रथम क्रमांक रोहित काकडे ( ९३.४० टक्के ) आणि दुसरा क्रमांक दीपश्री देसाई ( ९२.२० टक्के ) मिळाले. जुनी डोंबिवली येथील पाटील यांच्या साई वैभव क्लासचा निकाल 100% लागला. हमखास यशाची हमी देणारा क्लास अशी ओळख आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देऊन नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हसत-खेळत अभ्यास असे आगळे-वेगळे तंत्र या वैभव क्लासमध्ये उपयोगी आणले जाते असे क्लासच्या शिक्षका पाटील सांगतात.