स्टारप्लस आपल्या प्रेक्षकांसाठी 'तितली' नावाची एक अनोखी आणि यापूर्वी कधीही न पाहिलेली प्रेमकथा घेऊन येत आहे. ही कथा आपल्या मनातील प्रेम या संकल्पनेचाच पुनर्विचार करायला लावते की, खरंच प्रेम असं असतं का?
नेहा सोलंकी तितलीच्या शीर्षक भूमिकेत असून तिच्या समोर मुख्य भूमिकेत अविनाश मिश्रा असणार आहे, जो गर्वची भूमिका साकारत आहे. तितली ही एक वेधक प्रेमकथा आहे ज्यामध्ये तितली नावाची आनंदी, नटखट मुलगी तिच्या स्वप्नांचा राजकुमार शोधते आहे. परिकथेतील स्वप्नांप्रमाणे ती आपले आयुष्य गुलाबी करण्याच्या प्रयत्नांत आहे.
स्टार प्लसने नुकताच 'तितली'चा प्रोमो रिलीज केला. तितली आणि गर्वच्या दृष्टिकोनातील बदल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आपण पाहतोय की गर्व आणि तितली सुखी आहेत, पण लग्नानंतर तितलीचे आयुष्य बदलते. तितलीच्या आयुष्यातील नाट्य कसे उलगडत जाते, हे पाहणे मनोरंजक असेल.
तितली मालिकेच्या निमित्ताने वत्सल सेठ छोट्या पड्यावर परतत आहे. यामध्ये वत्सल राहुलची भूमिका साकारत असून राहुल सद्ध्या दुबईत रहात आहे. तितली आणि राहुल एकाच शाळेत शिकत होते जिथे राहुल तिला सिनियर होता. राहुल पहिल्याच नजरेत तितलीच्या प्रेमात पडतो. राहुलचे पात्र आकर्षक, मजेदार आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचे असले तरीही एक खोल गुपित राहुलने लपवून ठेवले आहे.
*वत्सल शेठ ही मालिका निवडण्यामागचे कारण स्पष्ट करताना म्हणतो की,* "या मालिकेला होकार देण्यामागे अनेक कारणे आहेत. निर्मात्यांना आणि चॅनलला वाटत होते की मी हा शो करावा, जरी माझ्या काही कमिटमेंट्स होत्या, तरी राहुलची व्यक्तिरेखा अशी काही होती की मला ती साकारायचीच होती. मी तितली या शोबद्दल खूप उत्सुक आहे आणि त्याचा एक भाग बनल्याचा मला आनंद आहे. स्टारप्लससोबतचे माझे संबंध नेहमीच खास राहिले आहेत. एक अभिनेता म्हणून मला नेहमीच काहीतरी रोमांचक आणि आव्हानात्मक करायचं होतं. एक व्यक्तिरेखा म्हणून राहुलची व्यक्तिरेखा अशी आहे की जी मी या आधी कधीही साकारलेली नाही. विशेष म्हणजे हा शो माझ्या हृदयाच्या अगदी जवळ असलेल्या एका महत्त्वाच्या मुद्द्याला अधोरेखित करतो.
आपण 21 व्या शतकात आहोत आणि इतकी प्रगती करूनही लोक एकमेकांचे शोषण करण्याचे नवनवीन मार्ग शोधत आहेत, हे खेदजनक आहे. हे केवळ शारीरिक शोषणाबाबत नाही, तर ते भावनिक अत्याचाराबाबतही आहे. भावनिक शोषणाबद्दल आपल्याला फार कमी माहिती आहे त्यामुळे त्याविषयी फार बोललं जातं नाही. हा शो प्रेक्षकांना याविषयीची जाणीव देईल. 'तितली'मध्ये काम करण्याचा अनुभव अप्रतिम होता. स्टारप्लस हे काम करण्यासाठी सर्वोत्तम चॅनल आहे. हा एक उत्तम अनुभव आहे."
तितलीची निर्मिती स्टोरी स्क्वेअर प्रॉडक्शनने केली आहे. तितलीचे प्रसारण 6 जूनपासून स्टारप्लसवर सोमवार ते रविवार रात्री 11 वाजता होईल.