भारताला सुवर्ण पदक जिंकून देण्यासाठी प्रयत्न सुरू
डोंबिवली ( शंकर जाधव )
डोंबिवलीची ईशा भगत या खेळाडूने इंडोनेशिया येथे पार पडलेल्या वर्ल्ड किंग बॉक्सिंगच्या स्पर्धेत दुसरी आली आहे. आत्तापर्यंतच्या प्रवासात एकूण 162 पदके , 200 पेक्षा अधिक प्रमाणपत्र आणि 20 पेक्षा अधिक ट्रॉफी मिळवणाऱ्या ईशा भगतने केवळ डोंबिवलीचे नाव महाराष्ट्र आणि देशभरात उंचावले आहे.भारताला सुवर्ण पदक जिंकून द्यायचे आहे.त्यासाठी तिने प्रयत्न देखील सुरू केले आहेत.
इंडोनेशिया येथे पार पडलेल्या अंडर 20 या बॉक्सिंगच्या स्पर्धेत एकूण 24 देश सहभागी झाले होते. शेवटच्या फेरीत रशियाच्या स्पर्धकाने ईशाचा पराभव केला. ईशाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.ऑलिम्पिकचे स्वप्न बाळगणाऱ्या ईशाला भारत देशासाठी ऑलिम्पिक खेळायचे आहे. भारताला सुवर्ण पदक जिंकून द्यायचे आहे.त्यासाठी तिने प्रयत्न देखील सुरू केले आहेत.
0खेळासाठी अनेकवेळा घरातील काही कार्यक्रम किंवा सण उत्सव बाजूला ठेवले. ईशाला अनेक क्षण आले की आता पुढे खेळू नये असे वाटू लागते. मात्र या सर्वांवर मात करून जेव्हा तुम्ही काहीतरी करू पाहता तेव्हा तुम्ही ध्येयापर्यंत पोहचता असे ईशा सांगते.
इशाने आत्तापर्यंत अनेक पदके प्राप्त केली आहेत. विशेष म्हणजे केवळ बॉक्सिंगच नव्हे तर हॉली बॉल , डच बॉल, लांब उडी या सर्वच खेळात ईशा पारंगत असून केवळ एकच खेळ नव्हे तर चित्रकला, डान्स या सर्वच क्षेत्रात ती लीलया वावरताना दिसते. बॉक्सिंग स्पर्धेच्या तयारीसाठी तिने खूप मेहनत केली होती. एकाच वेळ जेवत असे. नंतर तिने केवळ नारळ पाणी पिऊन आपला सराव चालू ठेवला होता असे तिच्या आई हेमांगी सांगते.
ईशा ही डोंबिवलीतील श्याम श्रीवास्तव यांच्या अर्बन आखाडा अकादमी येथे प्रशिक्षण घेत आहे. विशेष आगरी कोळी समाजातील मुली पुढे जात असून ईशा ही सर्वांसाठी प्रेरणेचा स्त्रोत आहे असे तिच्या मामा विशाल पाटील यांनी सांगितले.
