झेनो १०० प्रो स्मार्टफोन आणि पॉवरबँक बाजारात



८,५९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत स्मार्टफोन; ४५ वॉट फास्ट चार्जिंगसह २०,००० एमएएच पॉवरबँक


मुंबई : आयटेलने झेनो ब्रँडअंतर्गत झेनो १०० प्रो स्मार्टफोन आणि झेनो पॉवरबँक भारतीय बाजारात लॉन्च केले आहेत. कंपनीच्या दाव्यानुसार, झेनो १०० प्रो हा आपल्या सेगमेंटमधील परवडणारा स्मार्टफोन असून, त्याला मिलिटरी ग्रेड एमआयएल-एसटीडी-८१०एच सर्टिफिकेशन मिळाले आहे. नेटवर्क उपलब्ध नसतानाही कनेक्टिव्हिटी राखण्यास मदत करणारे अल्ट्रालिंक फीचरही फोनमध्ये देण्यात आले आहे.

झेनो १०० प्रोमध्ये ६.६ इंचाचा ९० हर्ट्झ एचडी प्लस डिस्प्ले, डीटीएस साऊंड, डायनॅमिक बार, ८ मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि आयआर ब्लास्टर देण्यात आला आहे. यामुळे टीव्ही, एसी यांसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे फोनद्वारे नियंत्रित करता येतात. हा फोन युनिसॉक टी७१०० ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि अँड्रॉइड १५ गो एडिशनवर चालतो. सुरक्षेसाठी फेस अनलॉक आणि साईड-माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सरची सुविधा आहे.

फोनमध्ये ५००० एमएएच बॅटरी आणि १० वॉट चार्जर देण्यात आला असून, तो कॉमेट ऑरेंज, क्लाउड व्हाईट आणि ब्लॅक या तीन रंगांत उपलब्ध आहे. ३ जीबी रॅम + ५ जीबी व्हर्च्युअल रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असलेल्या झेनो १०० प्रोची सुरुवातीची किंमत ८,५९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन अमेझॉनवर उपलब्ध आहे. तर झेनो लाइटची किंमत ७,९९९ रुपये असून, तो २ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजसह उपलब्ध आहे.

दरम्यान, कंपनीने १०,००० एमएएच आणि २०,००० एमएएच क्षमतेचे पॉवरबँकही सादर केले आहेत. २०,००० एमएएच मॉडेलमध्ये ४५ वॉट फास्ट चार्जिंग, पीडी ३.०, क्यूसी ३.० आणि ॲपल २.४ए चार्जिंग प्रोटोकॉलचा सपोर्ट आहे. डिजिटल बॅटरी डिस्प्ले, ड्युअल आउटपुट पोर्ट्स आणि इनबिल्ट टाइप-सी केबल यामुळे हा पॉवरबँक स्मार्टफोन, टॅबलेट तसेच काही सुसंगत लॅपटॉपसाठी उपयुक्त ठरतो.

तर १०,००० एमएएच पॉवरबँक कॉम्पॅक्ट डिझाइनसह असून, २२.५ वॉट फास्ट चार्जिंग, डिजिटल बॅटरी डिस्प्ले, ड्युअल आउटपुट पोर्ट्स आणि टाइप-सी टू टाइप-सी केबलची सुविधा देण्यात आली आहे. लॉन्च ऑफरअंतर्गत १०,००० एमएएच पॉवरबँक १,२९९ रुपये, तर २०,००० एमएएच मॉडेल २,०६९ रुपये किमतीत उपलब्ध असून, अतिरिक्त १० टक्के सवलतीची ऑफरही देण्यात आली आहे.

आयटेल इंडियाचे सीईओ अरिजीत तलापात्रा यांनी सांगितले की, झेनो सीरिजच्या माध्यमातून स्टायलिश, ट्रेंडी आणि भविष्यासाठी सज्ज तंत्रज्ञान ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. Gen Z ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन, परफॉर्मन्स आणि किंमत यांचा समतोल साधण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

Post a Comment

Previous Post Next Post