दिवा: ठाण्यातील दिव्यामध्ये एक-दोन नव्हे, तर चक्क ४३ शाळा अनधिकृत असून त्यामध्ये इंग्रजी माध्यमांची संख्या सर्वाधिक आहे. तब्बल अकरा हजारांपेक्षा अधिक मुलांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे. शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका या विद्यार्थ्यांना बसला आहे. या अनधिकृत शाळांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यातील विद्यार्थ्यांचे जवळच्या अधिकृत शाळांमध्ये समायोजन करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले.
दिव्यात एकूण सुमारे ६५ शाळा असून, त्यापैकी ४३ शाळा या अनधिकृत असून, त्यामध्ये सुमारे १० हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत होते. परंतु शैक्षणिक वर्ष सुरू सुमारे ११ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे समायोजन रखडले असून, त्यांचे शैक्षणिक भवितव्यदेखील टांगणीला लागले आहे.
छोट्याशा गाळ्यांमध्ये अनधिकृत शाळा चालवल्या जात आहेत. अतिशय गरीब कुटुंबातील हे विद्यार्थी असून, स्वस्तात प्रवेश मिळत असल्याने पालकही या शाळांना बळी पडत आहेत. अशा शाळांची यादी 'मेस्टा' या संस्थेने जाहीर केली असून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या या शाळांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दिव्यामध्ये लोकसंख्येच्या तुलनेत शाळाची संख्या कमी आहे. ही समावेश आहे. त्यामुळे येथील पालकांना आपल्या मुलांना ठाणे किंवा डोंबिवलीच्या शाळामध्ये प्रवेश घ्यावा लागतो. नेमकी ही बाब हेरून दिव्यामध्ये बेकायदा शाळांनीही आपली 'पटसंख्या' वाढवण्यास सुरुवात केली आहे. भाड्याच्या घरामध्ये, इमारतीमध्ये किंवा छोट्याशा गाळ्यामध्ये या अनधिकृत शाळा भरवल्या जात आहेत. यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळाची संख्या सर्वाधिक आहे.
४३ शाळांवर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हे यासंदर्भात ठाणे महापालिकेचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे याच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या अनधिकृत शाळाच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. या ४३ शाळांवर मुंबा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून, या शाळांमधील विद्यार्थ्यांचे समायोजन जवळील अधिकृत शाळामध्ये समायोजन करण्याचे अधांतरी राहण्याची शक्यता आहे. निर्देश अधिकाऱ्यांना दिल्याचेही राक्षे यांनी सांगितले.
.jpeg)