महाराष्ट्रातील नवोदित कलाकारांच्या स्वप्नांना मिळणार नवे व्यासपीठ; स्थानिक कला, संस्कृती आणि प्रतिभेचा उत्सव
मुंबई : भारतातील फुल-स्टॅक युझ्ड कार रिटेल प्लॅटफॉर्म स्पिनीने महाराष्ट्रात लोकप्रिय ठरत असलेल्या ‘मराठी लेजेंड्स’ या क्रिएटर-आधारित मनोरंजन कार्यक्रमासोबत भागीदारी केली आहे. या कार्यक्रमाचा स्पिनी मुख्य पाठीराखा (ड्रायव्हिंग पार्टनर) बनला असून, या माध्यमातून महाराष्ट्रातील नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्याचा आणि स्थानिक कला व संस्कृतीचा गौरव करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
‘मराठी लेजेंड्स’च्या माध्यमातून राज्यभरातील विनोदवीर, गायक, संगीतकार, नाट्यकलाकार, कथाकार आणि डिजिटल क्रिएटर्स यांना एकाच मंचावर आपली कला सादर करण्याची संधी मिळत आहे. प्रत्येक भागात नवोदित कलाकारांना मराठी मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांसोबत मंच शेअर करण्याची संधी मिळत असून, त्यांच्या कलागुणांना मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचवले जात आहे.
या भागीदारीबाबत बोलताना स्पिनीचे महाराष्ट्र क्लस्टर हेड अक्षय पाटील म्हणाले, "महाराष्ट्रातील स्थानिक गुणवत्तेला आणि नव्या प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम ‘मराठी लेजेंड्स’ करत आहे. हा महाराष्ट्राची संस्कृती, सर्जनशीलता आणि समुदायाचा उत्सव आहे. पुढील पिढीतील कलाकारांना योग्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणाऱ्या या व्यासपीठासोबत जोडले जाताना आम्हाला अभिमान वाटतो."
‘मराठी लेजेंड्स’चे निर्माते आणि सूत्रधार ‘मराठी कपिल’ यांनी सांगितले की, गुणवत्ता कोणत्याही ठिकाणाहून येऊ शकते आणि प्रत्येकाला आपली कला सादर करण्याची संधी मिळायला हवी, या विचारातून कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्पिनीने या उपक्रमाला साथ दिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
या सहकार्याची सुरुवात भाग क्रमांक १६ पासून झाली. या भागात कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, विजू माने आणि अभिजित चव्हाण यांचा समावेश असलेले दिग्गजांचे पॅनेल उपस्थित होते. विविध आवाजांची नक्कल करणारा प्रेम गायकवाड, संगीतकार कोमल गवळी, इन्फ्लुएन्सर लक्ष्मण बारकडे, नाट्यकलाकार पृथ्वी खेंगाटे यांच्यासह अनेक नवोदित गायक आणि विनोदवीरांनी ओपन माईक मंचावर आपली कला सादर केली.
गायक आफताब शाह याच्यासाठी हा मंच विशेष ठरला. नवोदित कलाकार म्हणून सादरीकरण केल्यानंतर त्याला प्रेक्षक आणि दिग्गज पॅनेलकडून उभे राहून टाळ्यांची दाद मिळाली. तसेच चित्रपट निर्माते विजू माने यांच्या आगामी चित्रपटात गायनाची संधीही त्याला मिळाली. एका मंचाने आणि एका संधीने कलाकाराच्या आयुष्याला नवी दिशा मिळू शकते, हे या प्रसंगातून अधोरेखित झाले.
कार्यक्रमाच्या परंपरेनुसार प्रेक्षकांमधील एका सदस्याला अतिथी परीक्षक म्हणून सहभागी करून घेण्यात आले. या भागातील सरप्राईज गेस्ट म्हणून स्पिनीचे अक्षय पाटील सहभागी झाले. विविध श्रेणीतील विजेत्यांना स्पिनीतर्फे भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
दरम्यान, या भागीदारीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील स्पिनीची वाढती उपस्थितीही अधोरेखित झाली आहे. मुंबईतील पाच कार हब आणि पुण्यातील ‘स्पिनी पार्क’ या फ्लॅगशिप एक्सपिरिएंशियल हबसह कंपनीचे राज्यात रिटेल नेटवर्क आहे. याशिवाय ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पनवेल, नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि रत्नागिरी या शहरांमध्ये होम डिलिव्हरी आणि डोअरस्टेप इन्स्पेक्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
महाराष्ट्रातील आपली उपस्थिती अधिक मजबूत करत असताना ‘मराठी लेजेंड्स’सोबतची ही भागीदारी केवळ मनोरंजन कार्यक्रमाला पाठिंबा देणारी नसून, राज्यातील नवोदित कलाकार, क्रिएटर्स, स्थानिक संस्कृती आणि समुदायांच्या प्रतिभेचा गौरव करणारा उपक्रम ठरत आहे.

