दिव्यतील धोकादायक केबल टोरंट कंपनीने काढल्या

 

मुंब्रादेवी कॉलनी परिसरातील धोकादायक केबल, पोल टोरंट पावर हटवले

दिवा / आरती मुळीक परब : दिवा मुंब्रा देवी कॉलनी परिसरातील धोकादायक झालेले वीजेचे जुने पोल बदलून या परिसरात टोरंट पावर कंपनीने भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याचे काम सुरू केले आहे. या कामामुळे तेथील १५ हजाराहून अधिक ग्राहकांना आता सुरक्षित व अखंडीत वीज पुरवठा होऊ शकेल.

मुंब्रा देवी परिसरात शंभरच्या आसपास इमारती आहेत. येथील ३० ते ४० इमारतीना जुन्या केबलद्वारे व हवेत लटकलेल्या केबलद्वारे वीज पुरवठा होत होता. या केबल्स जुन्या झाल्याने अनेकदा तुटून वीज पुरवठा खंडीत व्हायचा, तसेच अनधिकृत वीज केबलमुळे वीज पुरवठ्याला देखील व्यत्यय होत होता. स्थानिक रहिवाशांनी तेथील वीज पुरवठामध्ये सुधारणा करण्यासाठी टोरंट कंपनीला कळवले. 

कंपनीने विशेष मोहीम राबवून या परिसरातील धोकादायक, जुने झालेले 100 च्या वर असणारे पोल काढून टाकले. या पोलवरून केबल असुरक्षितरीत्या लोंबकळलेल्या स्थितीत होत्या. अनेक ठिकाणी या वीज वाहिन्या घरांच्या वरून तसेच काही लोकांच्या घरासमोरून जात होत्या. त्यातून अपघात होण्याची शक्यता होती. आता या सगळ्या जुन्या केबल काढून टाकून सर्व परिसरातील केबल भूमिगत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उघड्या वीज वाहिनीला स्पर्श होऊन शॉक लागण्याची तसेच केबल तुटण्याची भिती गेली गेली आहे, अशी माहिती टोरंट कंपनीतर्फे देण्यात आली. पहिल्या टप्प्यात ३० ते ४० इमारतींचा वीज पुरवठा आता सुरक्षित करण्यात आला असून वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार यामुळे टळणार आहे. या परिसरातून नवीन अंदाजे दोन हजार नवीन ग्राहकांनी वीज मीटर देण्यासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे.



Post a Comment

Previous Post Next Post