पहिल्या तिमाहीत ५० टक्के महसुल वाढीची नोंद
मुंबई : लिव्हप्युअर प्रा. लि. या भारताच्या आघाडीच्या गृह आणि राहणीमानाशी संबंधित उत्पादकांना चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आपल्या महसुलात ५० टक्क्यांपर्यंत भरघोस वाढ झाल्याची घोषणा करताना खूप आनंद होत आहे. ही कामगिरी ब्रँडच्या सर्वोत्तमता, नावीन्यपूर्णता आणि ग्राहक समाधान यांच्याप्रति सातत्यपूर्ण वचनबद्धतेचे प्रतीक आहे.
पहिल्या सहामाहीदरम्यान, लिव्हप्युअरने आपल्या सर्व व्यावसायिक क्षेत्रांमध्ये प्रचंड वाढ नोंदवली आहे आणि त्यामुळे लिव्हप्युअरच्या उत्पादन व सेवांमध्ये ग्राहकांचा विश्वास आणि आत्मविश्वास अधोरेखित झाला आहे. कंपनीच्या रिटेल उद्योगाने एकूण वाढीत ३५ टक्क्यांचे योगदान दिले आहे. आधुनिक व्यापार विभागातूनही ८७ टक्क्यांची मोठी वाढ दिसून आली असून ई वाणिज्य विभागात कौतुकास्पद ६३ टक्के वाढ झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे वॉटर एज ए सर्व्हिस व्यवसायाने सर्वांच्या अपेक्षांपलीकडे जाऊन कामगिरी केली असून महसुलात ९४ टक्क्यांची वाढ दर्शवली आहे आणि लिव्हप्युअरचे बाजारातील एक आघाडीचे उत्पादक म्हणून स्थान अधोरेखित केले आहे.
लिव्हप्युअरचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राकेश कौल म्हणाले की, “पहिल्या सहामाहीत आम्ही साध्य केलेल्या प्रचंड वाढीमुळे लिव्हप्युअरमधील आमच्या टीमला प्रचंड उत्साह आलेला आहे. हा टप्पा आमच्या टीम सदस्यांच्या अथक प्रयत्नांचे तसेच आमच्या ग्राहकांच्या अढळ निष्ठेचे प्रतीक आहे. लिव्हप्युअरची बाजारातील बदलत्या परिस्थितीशी आणि ग्राहकांच्या प्राधान्यक्रमांशी जुळवून घेण्याची क्षमता हा वेग कायम ठेवण्यातील एक महत्त्वाचा घटक ठरली आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या उद्योगातील प्रत्येक घटकात सर्वोत्तमता आणण्यासाठी प्रेरणा मिळते. आम्ही सातत्याने नावीन्यपूर्णता, उत्तम दर्जाच्या सेवा यांच्यावर लक्ष केंद्रित करतो आणि आमच्या यशाला चालना देण्यात आमच्या वितरण नेटवर्कचा विस्तारदेखील महत्त्वाचा ठरला आहे.”
लिव्हप्युअरने या प्रभावी वेगाला कायम ठेवण्यासाठी धोरणात्मक सकारात्मक धोका व्यवस्थापन दृष्टीकोन अंगीकारला आहे. आम्ही या क्षेत्राचा सखोल अभ्यास केला आहे आणि येणाऱ्या कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत. आम्ही आमची लक्ष्ये साध्य करण्यासाठी तसेच आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी तयार आहोत. पुढे जात असताना लिव्हप्युअरच्या भविष्यासाठी महत्त्वाकांक्षी वाढ आणि विकासाच्या योजना आहेत. आम्ही या आर्थिक वर्षाच्या शेवटापर्यंत मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत १०० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ साध्य करण्यासाठी तयार आहोत" असे ते म्हणाले.