श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळाचा उपक्रम
मुंबई : श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या सलग १०५ व्या वर्षानिमित्त श्रीकृष्ण पूजन व श्रीसत्यनारायण महापूजा सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला.
शुक्रवार, दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता मंडळाच्या शिवनेरी बिल्डिंग, दादर (पूर्व) येथील कार्यालयात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून तिर्थ-प्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमानंतर रात्री ७ वाजता सुरू झालेल्या सुरस आणि मधुर चक्री भजनांच्या कार्यक्रमाने संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारून गेला. भजनांच्या तालावर भाविकांनी हरिनामाचा गजर करत उत्साह व्यक्त केला.
या सोहळ्याचे आयोजन श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, वारंग परिवार, मित्र आणि मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. श्रद्धा, उत्साह आणि भक्तिभावाने संपन्न झालेल्या या कार्यक्रमात उपस्थित भाविकांनी समाधान व्यक्त केले.
त्यावेळी श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे अध्यक्ष नारायण सहदेव वारंग, सचीव मेघःशाम सहदेव वारंग, खजीनदार श्रीधर रविंद्रनाथ वारंग, तर सभासद अवधुत वारंग, दिनानाथ वारंग, सहदेव वारंग, महादेव वारंग, संजय वारंग, कॄंणा माळकर, भिकाजी वारंग, गुणाजी वारंग, सहदेव चव्हाण, भिकाजी चव्हाण, नंदु वारंग, तेजेश वारंग, शरद वारंग, समीर वारंग, विकास वारंग, नारायण वारंग, रनजित वारंग, बाबली चव्हाण, सतिश वारंग, राजन वारंग, आनंद वारंग कार्यक्रमाला उपस्थित होते.