नालेसफाईबाबत धन्यवाद म्हणत प्रशासनावर शिवसेना ठाकरे पक्षाची टीका



दिवा / आरती परब : दिव्यातील नालेसफाईच्या कामावर शिवसेना ठाकरे गटाचे दिवा शहर प्रमुख पाटील यांनी फेसबुकच्या माध्यमातून उपरोधिक टीका केली आहे. नालेसफाई व्यवस्थित झाल्यामुळे कोकणरत्न परिसरात कुठेही पाणी साचले नाही, अशा शब्दांत त्यांनी ठेकेदार आणि प्रशासनाचे ‘मनःपूर्वक आभार’ मानले.


तथापि, वास्तव चित्र याच्या उलट असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. गेल्या दोन दिवसांच्या पावसात कोकणरत्न परिसरातील सर्व चाळींमध्ये बाजूचा नाला न साफ केल्यामुळे पावसाचे पाणी घरात घुसले. त्यामुळे चाळकरी नागरिकांना दोन दिवस व तीन रात्री घरातील घाण पाणी काढण्यात व्यस्त रहावे लागले.

 


या त्रासाकडे लक्ष वेधत शहरप्रमुख सचिन पाटील यांनी उपरोधिक पद्धतीने प्रशासनाला धन्यवाद देत, नालेसफाईच्या नावाखाली नागरिकांना दिलासा मिळण्याऐवजी त्रासच सहन करावा लागत असल्याचे स्पष्ट केले.


स्थानिक नागरिकांनी देखील प्रशासनाने प्रत्यक्षात तातडीने नालेसफाई करून दयावी आणि पुन्हा अशा प्रकारचा पाणी साचण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, अशी मागणी केली आहे.




Post a Comment

Previous Post Next Post