दिव्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

 


एस.एस. इंडिया हायस्कूल आणि मुंब्रा देवी कॉलनी संघटनेचा उपक्रम 


दिवा \ आरती परब  :  दिव्यातील एस.एस. इंडिया हायस्कूल आणि मुंब्रा देवी कॉलनी संघटने तर्फे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी मुंब्रा देवी कॉलनीतील शिवसेना (शिंदे गट) शाखा प्रमुख गणेश गायकवाड यांनी महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून ध्वजारोहण केले.


शाळेचे संचालक सूरज सरोज यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना १५ ऑगस्टचे महत्त्व पटवून सांगितले. इयत्ता ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि आपापल्या विचारांचे सादरीकरण केले. काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली गीत गाऊन स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. या कार्यक्रमाला शिक्षक रोली, अंजली, शीला, उषा, रवि प्रकाश, श्रुती, राहुल, रोकेश, माधुरी,रशिका, मानसी, रीमा, पूजा, रेखा, काजल, शशी, ममता, शीतल यांच्यासह मुंब्रा देवी कॉलनी संघटनेचे अध्यक्ष नितीन घेवडे, कार्याध्यक्ष प्रकाश कदम, सेक्रेटरी सूर्यकांत गायकवाड, विश्वनाथ भूतल, विद्या जाधव, प्रणाली भुतल, अरुण कुरमुर्लेकर तसेच मोठ्या संख्येने रहिवासी व शालेय विद्यार्थी पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना शाळेचे संचालक सुरज सरोज यांच्याकडून लाडूंचे वाटप करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post