मुंबई,(प्रतिनिधी) : म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहप्रकल्पांतर्गत विविध उत्पन्न गटांसाठी ४०८२ सदनिकांची ऑनलाईन सोडत सोमवार दि १४ ऑगस्ट,२०२३ रोजी काढण्यात येणार आहे अशी माहिती गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांनी दिली.
मुंबई मंडळाच्या सोडतीत एकूण ४०८३ सदनिकांचा समावेश आहे. यात अत्यल्प उत्पन्न गटासाठी २७९०, अल्प उत्पन्न गटासाठी १०३४, मध्यम उत्पन्न गटासाठी १३९ आणि उच्च उत्पन्न गटासाठी १२० सदनिका आहेत. सोडतीमधील अत्यल्प उत्पन्न गटात पहाडी गोरेगाव पश्चिम येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील १९४७, अॅन्टॉप हिलमधील ४१७ तर, विक्रोळीच्या कन्नमवार नगरमधील ४२४ अशी एकूण २७८८ सदनिका समाविष्ट आहेत. अल्प उत्पन्न गटात एकूण १०३४ सदनिका असून गोरेगावमधील पहाडी परिसरातील ७३६ सदनिकांचा त्यात समावेश आहे. या सोडतीत १ लाख २० हजार १४४ अर्ज दाखल झाले आहेत.