मोठा गावं ते ठाणे ,घाटकोपर मेट्रो स्थानकादरम्यान इलेक्ट्रिक बस धावणार
डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण - डोंबिवली शहरातील वाहनाची होणारी वाहतूक कोंडी ही नागरिकांसाठी डोकेदुखी बनली आहे. त्यातच डोंबिवली कल्याणहून ठाणे मुंबई शहराकडे जाण्या - येण्यासाठी वाहनांच्या कोंडीच्या अडथळ्याची शर्यत, लोकलची गर्दी, वाहतूक कोंडी यातून नागरिकांची लवकरच सुटका होणार असून कल्याण हून ठाणे मुंबई शहराकडे जाण्या - येण्यासाठी वेळेची बचत होणार आहे.
महत्त्वाकांक्षी अश्या मोठा गांव (डोंबिवली) ते माणकोली (भिवंडी) उड्डाणपूल उभारण्याचे काम जलद गतीने सुरू असून येत्या दिवाळी पर्यत उड्डाणपूलाचे काम पूर्णत्वास येणार असून वाहतुकीस खुला करण्यात येणार आहे. डोंबिवलीकरांना अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत ठाणे व मुंबई शहराकडे वाहनाने प्रवास करण्याचा मार्ग सुकर होणार आहे. मोठा गावं ते ठाणे , घाटकोपर मेट्रो स्थांनक या मार्गावर केडीएमटी उपक्रमाच्या इलेक्ट्रिक एसी बसेस सुरू होणार आहे.