ऑपरेशन सतर्क : दिवा स्थानकावर आरपीएफची मोठी कारवाई,




सावंतवाडी- दिवा गाडीत अवैध मद्य जप्त


दिवा / आरती परब : 
मुंबई विभागातील दिवा रेल्वे स्थानकावर आरपीएफने “ऑपरेशन सतर्क” अंतर्गत केलेल्या तपासणी दरम्यान अवैध दारूचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. रात्री ट्रेन क्रमांक १०१०६ सावंतवाडी- दिवा पॅसेंजरच्या तपासणी दरम्यान ही कारवाई करण्यात आली.

रात्री सुमारे ८.३३ वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वर आलेल्या गाडीची तपासणी करताना हेडकॉन्स्टेबल  श्रीवास्तव यांनी एका डब्यात वरच्या रॅकवर दोन संशयास्पद पांढऱ्या गोण्या आढळल्या. या गोण्यांबाबत प्रवाशांना चौकशी केली असता कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर महिला उपनिरिक्षक पिंकी यादव यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.

गोण्या उघडून पाहिल्यावर त्यामध्ये रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या ३४ बाटल्या (प्रत्येकी ७५० मि.ली.) आढळून आल्या. एका बाटलीची किंमत अंदाजे ३७० रुपये असून एकूण मालाची किंमत सुमारे १२,५८० रुपये इतकी होते.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पंचासमक्ष सील करून पुढील कार्यवाहीसाठी जीआरपी ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी १८ ऑगस्ट रोजी जीआरपी ठाणे पोलीस ठाण्यात एफआयआर क्र. ०८८७/२५ भादंवि कलम ६५(ई) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आरपीएफ दिवाच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post