सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल

 नवी दिल्ली: काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

कॉँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी या दोन दिवसांपूर्वी मुंबईत इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी राहुल गांधी यांच्या सोबत आल्या होत्या. येथील कार्यक्रम संपवून त्या पुन्हा दिल्लीला गेल्या होत्या. आज सकाळी त्यांना ताप आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. सध्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. 

याआधी मार्चमध्येही प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोनिया गांधी यांना सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तथापि, एका दिवसानंतर जारी करण्यात आलेल्या वैद्यकीय बुलेटिनमध्ये म्हटले की त्यांची प्रकृती स्थिर असून त्या ठीक आहेत.  दरम्यान, कॉँग्रेसचे बडे नेते त्यांच्या भेटीला दवाखान्यात गेले असल्याची देखील माहिती मिळत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post