डोंबिवलीत रंगणार महाबली बजरंग बली ' धार्मिक कार्यक्रम


दिपेश म्हात्रे फाऊंडेशन दहीहंडी उत्सवाला गतिमंद मुलांच्या गोविंदा पथक करणार धम्माल 

डोंबिवली ( शंकर जाधव ) :  दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातुन शहरातील तरुणाईला आकर्षित करण्यासाठी यंदा शहरातील प्रमुख रस्त्यावर चौकात शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमासह लाखो रुपयांच्या बक्षिसाच्या दहीहंडी उभारण्याचे आयोजन केल्याने यंदा दहीहंडी मंडळावर बक्षिसांची खैरात केली जाणार असल्याचे दिसून येत आहे. डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते दिपेश म्हात्रे फाऊंडेशनच्या माध्यमातून लाखो रुपयांच्या पारितोषिक असलेले लाख मोलाची दहीहंडी उभारण्यात आली आहे. यानिमित्ताने डोंबिवलीत पहिल्यांदा 'महा बली बजरंग बली' धार्मिक कार्यक्रम होणार असून अनेक सामाजिक संस्थांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान होणार आहे अशी माहिती युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी सांगितले. 

डोंबिवली पश्चिमेकडे कडील सम्राट चौकात होणाऱ्या दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आवर्जून उपस्थित राहणार आल्याचेही सांगितले.या दहीहंडी उत्सवात पहिले पारितोषिक १ लाख रुपये तर महिला गोविंदा पथकास ५१ हजार तर इतर गोविंद पथकास अनेक पारितोषिक असे एकूण १५ लाख रुपयांची पारितोषिक देण्यात येणार आहे. यावेळी फिरते रुग्णवाहिकेची सोय केली जाणार आहे. गायक आनंद शिंदे व मराठी अभिनेते संतोष जुईकर यांचंबरोबर अनेक सेलिब्रेटी या दहीहंडी उत्सवात हजेरी लावणार आहे. क्षितिज संचालित गतिमंद मुलांच्या शाळेतील विद्यार्थी सकाळी ११ वाजता गतिमंद दहीहंडी फोडणार आहेत.या मुलांसाठी सुरक्षा ठेवण्यात आली आहे.



Post a Comment

Previous Post Next Post