मंगळागौर कार्यक्रमात महिला पोलिसांचा सन्मान

 


शिवसेना डोंबिवली ग्रामीण आघाडीचा उपक्रम 

डोंबिवली ( शंकर जाधव ) : शिवसेना डोंबिवली ग्रामीण महिला आघाडीच्या वतीने डोंबिवली पूर्वेकडील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात मंगळागौर आयोजित करण्यात आली होती. यावेळी  खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली शिंदे यांची विशेष उपस्थिती होती. शिवसेना कल्याण तालुकाप्रमुख महेश पाटील, क्राईम पेट्रोल फेम अभिनेते सतीश नायकोडी , महिला आघाडी प्रमुख लता पाटील, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेविका सायली विचारे, पलव्वी पाटील,गजानन व्यापारी, आदिसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महिला पोलिसांचा विशेष सन्मान करण्यात आले.मंगळागौर कार्यक्रमासाठी सुमारे दोन हजार महिलांनी उपस्थिती दर्शविली होती.

Post a Comment

Previous Post Next Post