डोंबिवली ( शंकर जाधव ): सर्वेक्षणानुसार तीन वर्षात देशातील वाहन अपघातामागील कारण वाहनचालकांतील दृष्टीदोष आहे. जवळपास ४० टक्के वाहनचालकांना दृष्टीदोष असून त्यावर उपचार केल्यास अपघातांची संख्या कमी होतील. यासाठी शासनाकडून राज्यभर वाहनचालकांसाठी नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले केले. कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात शिबीरात अनेक वाहनचालकांचे नेत्र तपासण्यात आले.यावेळी निरीक्षकांनी वाहनचालकांना रस्ता सुरक्षिततेबाबत समुपदेशन करण्यात आले.
कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून २३ ऑगस्ट रोजी कल्याण येथील बिर्ला महाविद्यालय, २५ ऑगस्ट रोजी केडीएमटी आगर, २९ ऑगस्ट रोजी कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व ६ सप्टेंबर रोजी डोंबिवलीतील कामा संघटनेच्या कार्यालयात प्रवासी वाहन, स्कूल बस व इतर वाहनचालकांची नेत्र तपासणी करण्यात आल्याचे वरिष्ठ लिपिक मनीष जाधव, अजित येणारे,कनिष्ठ दत्तात्रय पागे व वरिष्ठ लिपिक विजय मासरे, राहुल सकपाळ यांनी माहिती दिली. कामा संघटनेच्या कार्यालयात पार पडलेल्या शिबिरात उल्हासनगर मधील सेंटर रूग्णालयाचे डॉ. नितीन परदेशी यांनी वाहनचालकांचे नेत्र तपासणी केली. तसेच वाहनचालकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. यावेळी रुग्णालयाचे इब्राहीम बेलदार, शोभना काकड, अम्वापली घोलप, सुवर्णा सातपुते उपस्थित होते.रस्ता सुरक्षा अभियानांतर्ग परिवहन आयुक्तालयामार्फत जनजागृती कार्यक्रमासाठी पाच लाख रुपयाचा निधी देण्यात आला आहे.तर कामा संघटनेचे पदाधिकारी डॉ. देवेन सोनी, कमलाकर, उद्य वालावलकर यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
