दिवा, (आरती मुळीक परब) : दिव्यात शिवसेना दिवा शहर महिला आघाडीच्या अर्चना निलेश पाटील यांच्यातर्फे राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेचे शनिवारी ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता आकांशा सभागृहात आयोजन केले आहे. तसेच जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
या कार्यक्रमाच्या किरण संतोष शितकर संयोजिका असून प्रथम विजेत्या महिला मंगलागौर ग्रुपला २१००० रोख रुपये, दुसरे पारितोषिक ११,००० रोख रुपये तर तिसरे पारितोषिक ७००० रोख रक्कम असून उत्कृष्ठ उखाणा घेणाऱ्या महीलांसाठी पैठणी साडी देण्यात येणार आहे, अशी माहिती अर्चना निलेश पाटील यांनी दिली आहे.
Tags
महाराष्ट्र

