आर्यन खान प्रकरणात लाच घेतल्याच्या आरोपातून समीर वानखडेंची निर्दोष सुटका


मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरुखच्या मुलाला आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. तत्कालीन एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी ही कारवाई केली होती. समीर वानखेडे यांच्यावर आर्यन खानला सोडवण्यासाठी बॉलिवूड स्टार शाहरूख खानकडून २५ कोटींची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, चौकशीत समीर खान यांनी कोणतीही लाच घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कॅटच्या या निर्णयामुळे समीर वानखेडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

याप्रकरणी कॅटने समीर वानखेडे यांच्या बाजूने निकाल दिला. समीर वानखेडे यांच्यावरील आरोप खोटे असून ते निर्दोष असल्याचे कॅटने म्हटले आहे. कॅटने आपल्या आदेशात असे म्हटले आहे की, समीर वानखेडे यांच्यासाठी जी चौकशी समिती नेमण्यात आली होती, या समितीत एनसीबी संचालक ज्ञानेश्वर सिंह नव्हते. त्यांनी जो तपास केला, त्याची सर्व माहिती सिंह यांना होती, असे म्हणता येणार नसल्याचे म्हटले आहे. 

मुंबईत कॉर्डेलिया क्रुज शिपवर सुरू असलेल्या रेव पार्टी अमली पदार्थ असल्याची माहिती समीर वानखेडे यांना मिळाली. यावरून समीर वानखेडे यांनी एनसीबीच्या काही अधिकाऱ्यांसह या शीपवर धाड टाकली. धाड टाकल्यानंतर अनेकजण अमली पदार्थाचे सेवन करत असल्याचे निदर्शनास आले होते.

ज्यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान देखील होता. ज्यामुळे त्याला काही दिवस तरुंगातही राहावे लागले होते. दरम्यान, याप्रकरणी आर्यन खानला सोडवण्यासाठी समीर वानखेडे यांनी शाहरूख खानकडून २५ कोटींची लाच मागितली होती, असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. यावर मोठी चौकशी झाली.

Tag : #बॉलिवूडचा किंग शाहरुख खान # आर्यन खान ड्रग्ज प्रकरण # तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे # २५ कोटींची लाच

Post a Comment

Previous Post Next Post