कोकणातील बसचे नवीन दर जाहीर
मुंबई: गणेशोत्सव काळात खासगी वाहतूकदारांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी महामंडळाने ज्यादा बसेस सोबतच नवे दर देखील जाहीर केले आहेत. कोणत्याही खासगी बस वाहतूकदाराला या दराच्या ५० टक्के अधिक (दीडपट) आकारणी करण्यास परवानगी आहे. पण या दराच्या दीडपटापेक्षा जास्त भाडे आकारणी झाल्यास प्रवाशांनी ०२३५२-२२५४४४ या व्हॉटस् ॲप क्रमांकावर वाहन, वाहनाचा नोंदणी क्रमांक व भाडे आकारणी तिकीट यांच्या फोटोसह तक्रार नोंदवावी, असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनी केले आहे.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणने शेअर रिक्षा थांबे आणि दरपत्रक देखील ठरवून दिलेले आहेत, त्यानुसारच प्रवाशांनी भाडे द्यावे, असे आवाहनही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे. या दराच्या अधिक दराने भाडे वसूल केल्यास प्रवाशांना तक्रार करण्यासाठी महामंडळाकडून नंबर उपलब्ध करून देण्यात आला आहे. अधिक दर आकारल्यास प्रवाशांनी ०२३५२-२२५४४४ या व्हॉटस् ॲप नंबरवर तिकीटाचा फोटो, वाहन क्रमांक याच्यासह तक्रार करावी. असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनी केले आहे.
महामंडळाकडून जाहीर केलेले नवे दर
- रत्नागिरी ते मुंबई अनुक्रमे– साधे ५२५ रुपये, शिवशाही (वातानुकुलित) ८१५ रुपये, शयनयान (विना वातानुकुलित) ७१० रुपये.
- रत्नागिरी ते ठाणे – ५०५ रुपये, ७५० रुपये, ६९० रुपये.
- रत्नागिरी ते बोरीवली - ५५० रुपये, ८१५ रुपये, ७५० रुपये.
- रत्नागिरी ते पुणे/पिंपरी – ४९० रुपये, ७२५ रुपये, ६६५ रुपये.
- चिपळूण ते मुंबई – ३९० रुपये, ५८५ रुपये, ५३५ रुपये.
- चिपळूण ते पुणे – ३६० रुपये, ५३० रुपये, ४८५ रुपये.
- दापोली ते मुंबई – ३५० रुपये, ५२० रुपये, ४७५ रुपये.
- दापोली ते ठाणे - ३६० रुपये, ५३० रुपये, ४८५ रुपये.
- दापोली ते बोरोवली – ३७५ रुपये, ५५५ रुपये, ५१० रुपये
- दापोली ते पुणे/पिंपरी – ३५० रुपये, ५२० रुपये, ४७५ रुपये.
.jpeg)