पद नियुक्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी दिव्यातील अनेक तरुणतरुणींना तालुका पातळीवर पद नियुक्ती देत काम करण्याची संधी त्यांना देण्यात आली. तसेच दिवा भाजप मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांच्या नेतृत्वाखाली दिव्यातील म्हातार्डी गावातील उद्योजक धर्मेंद्र शेलार यांनी भाजपचा झेंडा हाती घेत शेकडो कार्यकर्त्यांसहित पक्षात प्रवेश केला.
धर्मेंद्र शेलार यांना राजकारणाचा दांडगा अनुभव असून ते डोंबिवली शहरातून गेली कित्येक वर्षे भाजपमध्ये सदस्य होते पण व्यवसायामुळे त्यांनी भाजपमध्ये सक्रिय काम केले नव्हते. त्यामुळे पुन्हा दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांच्या नेतृत्वाखाली शेलार यांनी दिव्यातील भाजप पक्षात येऊन पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांच्या हस्ते उपाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र घेऊन हाती कमळ घेतले. त्यावेळी त्यांना ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुलेंनी पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.
Tags
महाराष्ट्र
