दिवा (आरती मुळीक परब) : भाजप दिवा शीळ मंडळांची कार्यकारिणी जाहीर झाली. त्यावेळी समाजसेवक अशोक सोलंकी यांची पुनः गुजराती सेल अध्यक्षपदी निवड करण्यात आली. वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आणि समाजसेवेत कार्यरत असलेले अशोक सोलंकी यांची पुनः गुजराती सेल अध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याने गुजराती समाजात आनंदाचे वातावरण आहे. त्यांना पद नियुक्ती करताना ठाणे जिल्हा शहर अध्यक्ष संजय वाघुले आणि दिवा शीळ मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांनी पुढील वाटचालीसाठी त्यांचे अभिनंदन केले.
अशोक सोलंकी यांची नियुक्ती वेळी त्यांची पूर्ण गुजराती टीम तेव्हा उपस्थित होती. हर्षाबेन, विणूबेन, अशोक पटेल, किशन वालेरा, मिनू गोहिल, भाग्यश्री पटेल, महेश जागरिया, किशोर दंतानी, किरण सोलंकी, सोनाबेन जगरिया, जिनल सोलंकी सगळे त्यावेळी हजर होते. अशोक सोलंकी यांना पुनः अध्यक्ष पद मिळाल्याबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला.
