School time change : प्राथमिक शाळेच्या सकाळच्या वेळा बदलण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठीत




शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची घोषणा

मुंबई: राज्यातील प्राथमिक शाळेच्या सकाळच्या वेळा बदलण्याच्या सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी सरकारला केल्या होत्या. त्यावर राज्यपालांच्या सूचनेला सहमती दाखवत येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी ९ वाजल्यानंतरच सुरू करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी केली. याबाबत मनोवैज्ञानिक, बालरोग तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे दीपक केसरकर यांनी सांगितले आहे.

राज्यपाल रमेश बैस यांनी या शाळांच्या वेळा बदलण्याच्या सूचना केल्या होत्या. याची दखल घेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्यपालांच्या या मताशी सरकार सहमत आहे. मात्र एकट्याने याबाबत निर्णय घेणे योग्य नसल्याने तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. मनोवैज्ञानिक, बालरोग तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे दीपक केसरकर यांनी सांगितले आहे.

पुढील शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमांच्या आणि सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांना हा नियम लागू होणार आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रातील शाळेची वेळ सात ऐवजी नऊपर्यंत पुढे ढकलल्यास मुलांची झोप पूर्ण होऊन त्यांना शिक्षणाची गोडी लागेल, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.

तसेच बालवाडी, छोटा शिशू आणि मोठा शिशू हे वर्ग निर्माण करून ते मुख्य शाळेला जोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानंतर आता बालवाडी ते दुसरीला ‘पूर्व प्राथमिक विभाग’ संबोधण्यात येणार आहे. राज्यात प्राथमिक शाळा या सकाळी तर माध्यमिक शाळा या दुपारी भरतात. माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे वय १२ वर्षांच्या पुढे तर प्राथमिक शाळांमधील मुलांचे वय ३ ते १० वर्ष असल्याने प्राथमिक शाळा या दुपारी भराव्या अशी मागणी शिक्षणतज्ज्ञांकडून गेला काही दिवसांपासूंन होत होत होती.

 राज्यातील प्राथमिक शाळा या सकाळी भरतात. मुलांची शाळा सकाळी असल्याने त्यांना झोपेतून उठवून शाळेची तयारी करून त्यांना शाळेत पाठवणे हे पालकांसाठी दिव्य काम असतं. सकाळी शाळा असल्यामुळे मुलांची झोप पूर्ण न होऊन त्यांच्या प्रकृतीवर देखील परिणाम होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्याचबरोबर मुलांच्या दप्तराचा भार हलका करण्यासाठी ‘पुस्तक – विहीन’ शाळा, ई – वर्ग यांना चालना द्यावी. तसेच शाळांचे गुणवत्तेनुसार श्रेणीकरण करावे, अशाही सूचना राज्यपालांनी केल्या होत्या. यासंदर्भात 

राज्यपाल रमेश बैस यांनी शाळांची वेळ बदलण्याची सूचना योग्य असली तरी तिची अमंलबजावणी व्यवहार्य नाही असे मत शिक्षण संस्थाचालकांनी व्यक्त केले होते. सकाळच्या सत्रातील शाळांमुळे विद्यार्थ्यांची झोप होत नाही हे म्हणणे योग्य असले, तरी शाळेची वेळ बदलणे अनेक ठिकाणी शक्य होणार नाही, असे संस्थाचालकांनी म्हटले होते.

     


Post a Comment

Previous Post Next Post