केवळ नरेंद्र मोदींमुळेच आपला देश पुढे

 

खासदार सुनील तटकरे यांचे प्रतिपादन 

अलिबाग, (धनंजय कवठेकर): जी २० परिषदेचे यजमान पद भारत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारून ती यशस्वीसुद्धा केली. मात्र विरोधकांनी साधे मोदीजी यांचे साधे अभिनंदन केले नाही. आशियाई परिषद देशातील झाली तेव्हा कौतुक करण्यात आला. देश आपला पुढे जात आहे ते केवळ मोदी यांच्या मुळेच असे प्रतिप्रादन खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी अलिबाग येथील समुद्र किनारी आयोजित महायुतीच्या समन्वय मेळाव्यात केले.

यावेळी खासदार तटकरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, राज्यात महायुतीमध्ये १५ घटक पक्ष, एकाच दिवशी ३६ जिल्ह्यांत समन्वय मेळावे घेण्याचे काम आजच्या दिवशी सुरू आहे. राज्यात महायुतीमध्ये एकूण १५ घटक पक्षांचा समावेश आहे. या १५ राजकीय पक्षांच्या समन्वयातून आगामी लोकसभा निवडणूक लढवली जाणार आहे.

काही दिवसापूर्वी महायुतीचे नेत्याचा निर्णय झाला की महायुती मेळावे घेण्याचे ठरले. २ जुलै २०२३ रोजी अजित पवार यांनी निर्णय घेतला. नऊ वर्षात देशाने प्रगती पाहिली आहे. चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर मोदी यांचे अभिनंदन करण्याचे काम विरोधकांनी केले नाही. मात्र जेव्हा इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान पासून बांगलादेश वेगळा करण्यात आला तेव्हा विरोधी पक्षनेते माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी अभिनंदन केले होते. रायगड जिल्ह्यात नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून रायगडचा विकास हा झपाट्याने होत असल्याने भविष्यात रायगडचे चित्र बदलले जाणार आहे. महाराष्ट्रात युतीचे सरकार काम गतीने करीत आहे. महायुती वर केलेली टीकेला उत्तर देण्याचे काम आपल्याला करायचे आहेत. शेतकरी यांच्या हिताचे निर्णय सरकारने घेतले आहे. मोदी यांच्या माध्यमातून पीएमकिसान योजना अंतर्गत सहा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत असताना राज्य सरकारकडून सहा हजार असे मिळून बारा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत आहे. शिवसेना जिल्ह्यात वाढत गेली. मोदी यांच्या मुळे जिल्ह्यात पक्ष वाढत आहे. आज जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपचे तीन तीन आमदार आहेत. ज्यांनी 

आठवेळा निवडणूक या भाजपसोबत लढविल्या. त्या भाजपला नेस्तनाबूत केल्या शकणार नाही असे वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केले होते. मात्र त्याचा इतिहास कच्चा आहे. एके काळी केंद्रात भाजपचे दोन खासदार असताना देखील आता त्याची संख्या ही तीनशेच्या घरात आहे. लोकसभेची निवडणूक २००९ नंतर शेकापला लढण्याची हिम्मत झाली नाही. अनेक वेळा विरोधक यांच्याकडून टीका टिप्पणी केली जाते. अपयश पचविण्यासाठी मोठे मन लागते ते विरोधकांमध्ये नाही आहे.

मोदी हेच बहुमताने निवडून येतील. अंतुले यांचे स्वप्न साकार करण्याचे काम महायुती पूर्ण करणार आहे. राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय दिला आहे तो ऐतिहासिक आहे. त्याबद्दल त्यांचे जाहीर अभिनंदन  महायुती आघाडी आगामी निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे.

या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळाली असताना विरोधक यांच्या मनात पोट शुळ निर्माण झाले आहे. ते तसेच राहू द्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारचे भरीव विकासात्मक कार्य सुरू आहे. देशातील १४० कोटी जनतेचा विश्वास नरेंद्र मोदी यांनी संपादित केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्यात महायुती सरकार सर्वांगीण विकास करीत आहेत. सरकारने विकासाचे अनेक मोठे प्रकल्प मार्गी लावण्यासोबतच शासन आपल्या दारी अभियानच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची कामे निकाली काढले आहेत. राज्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी महायुती सरकारने पूर्ण प्रयत्न आहेत. केंद्र व राज्य सरकारने राबवलेले विकास कार्य जनतेसमोर मांडण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. आगामी लोकसभा निवडणूक १५ पक्षांचा समावेश असलेली महायुती म्हणून लढली जाणार आहे, खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले की,महा युतीच्या नेत्यांनी निर्णय घेतल्यानंतर हे मेळावे संपन्न होत आहे. प्रमुख पक्षाचे पदाधिकारी या जिल्ह्याचे नेतृत्व कोणाच्या हातात दयायचे आहे. यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेचे मुख्य नेत एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतल्यानंतर भाजप सेना युती ही सत्तेत आलो. प्रमुख कार्यकर्ते यांचा मनोमिलन व्हावे त्यासाठी मेळावा घेत आहोत. मुंबई - गोवा हायवेला जीवदान देण्याचे काम गडकरी यानी केले आहे. ५६ हजार किमी रस्ते त्यांनी केले आहे. ते मोदी यांच्या मदतीने २२ तारखेला पाचशे वर्षांची लढाई संपुष्टात येणार आहे. नेतृत्वाने दिलेला आदर्श सर्व कार्यकर्त्यानी पाळावा असे आव्हान केले.

आमदार भरत गोगावले यांनी आजचा मेळावा ३६ जिल्ह्यात सुरू केला आहे. आपला मेळावा कधी एकत्र होतो याची वाट कार्यकर्ते पाहत होते. विकास कामांबाबत अनेक नेत्यांनी सांगितले. गरिबांना मोफत धान्य मिळणार आहेत. मोदी काय चमत्कार करतील हे कोणीच सांगू शकणार नाही. त्यामुळे त्यांच्या नादाला कोणीही लागू नये. मेळावा तुम्हा कार्यकर्त्यांसाठी आहे व तुम्ही एकत्रीत येणार आहेत.

खालच्या कार्यकर्त्यामुळे ग्रामपंचायती या विरोधकांकडे गेल्या. खरोखरच आगामी काळात युतीचे सरकार आणायचे असेल तर सर्वांनी एकत्रित येणे गरचेआहे. ग्रामपंचायत हे मुख्य आधार आहे. सातच्या सात आमदार आणि दोन खासदार मोठ्या फरकाने निवडून आणू शकतो. खासदार यांना महाड विधान सभा निवडणुकीत ३५ हजार लीड देवू शकतो. मात्र निवडून आणल्यानंतर तूम्ही कोण आणि आम्ही कोण असे नको. कार्यकर्ते हे गरजेच्या वेळी फोन करीत असतात, त्यांचे फोन उचलून मदत करावी. सामान्य जनता ही आपण तिघेही एकत्र असेल तर हसत स्वागत करतील. नाहीतर तुम्हाला नाही आम्हाला नाही घाल.. अशी अवस्था होणार आहे. प्रत्येक मंदिरात रोषणाई करावी असे आव्हान केले. एक दिवा रामासाठी लावायचे आहे. 

 आमदार भरत गोगावले


 या जिल्ह्यात खासदार, आमदार यांना निवडून आणायचे आहे. देशाच्या नेतृत्वला तोड नाही. मोदी सरकार आल्यापासून विकास कामे जोरात सुरू आहे. विकास कामे करायची असतील तर मोदी गरजेचे आहे. मोदींची जल मिशन योजना ही महत्वाची आहे. आजूनही रायगडचा माणूस हा तहानलेला आहे. त्याला तृप्त करण्याचे काम मोदी यानी केलेआहे. वीस तास काम करणारा प्रधानमंत्री मिळाला आहे. ४८ खासदार निवडून येवू शकतील. जिल्हा परिषद ही आपल्याकडे आली पाहिजे. ही युती अशीच अबाधित राहू द्या.

आमदार रविंद्र पाटील 

Post a Comment

Previous Post Next Post