डोंबिवली ( शंकर जाधव ) : सांगली येथील वारणा सभागृहात पार पडलेल्या DSO राज्य ज्युदो स्पर्धेत (१७ आणि १९ वर्षांखालील मुली आणि मुले) डोंबिवली पश्चिमेकडील सेव्हन फायटर्स क्लबच्या खेळाडूंनी सुयश मिळविले.विजेत्या खेळाडूंची
SGFI राष्ट्रीय ज्युडो चॅम्पियनशिप २०२३२४ साठी निवड झाल्याची माहिती प्रशिक्षक मंगेश भोसले यांनी दिली.
DSO राज्य ज्युदो स्पर्धेत मृण्मयी बेंडखळे - सुवर्ण-वजन श्रेणी (५२), भक्ती भोसले - सुवर्ण - वजन श्रेणी - (४८), सायली विजेश - सुवर्ण- वजन श्रेणी -(+ ७०), शेखर कर्डक - सुवर्ण-वजन श्रेणी -(- ४५ ) आणि मोहित मूल्या - सुवर्ण -वजन श्रेणी -(- ५०) अशी विजेत्या खेळाडूंची नावे आहेत.
