बीएलएस इंटरनॅशनलचा जागतिक विस्तार



तुर्कस्थानस्थित व्हिसा आणि कॉन्सुलर सेवा पुरवठादार 'आयडेटा'चे संपादन केले 

मुंबई, सरकार आणि लोकांसाठी एक आघाडीची जागतिक तंत्रज्ञान-सक्षम सेवा भागीदार कंपनी असलेल्या बीएलएस इंटरनॅशनल सर्व्हिसेस लिमिटेड (बीएलएस) ने आज आयडेटा डॅनिसमानलिक वे हिजमेट दिस टिकारेट एनोनिम सरकेटी (“iDATA”आणि त्याच्या पूर्ण मालकीच्या उपकंपन्यांमध्ये एंटरप्राइज मूल्य ५० दशलक्ष युरो (४५० कोटी) आणि अतिरिक्त टप्पे आधारित प्रदानांद्वारे १००% भागभांडवल संपादन करण्यासाठी बीएलएस इंटरनॅशनल एफझेडईयूएई या तिच्या पूर्णपणे मालकीच्या कंपनीमार्फत निश्चित शेअर खरेदी करार केला आहे. आयडेटा ही तुर्कस्तानमधील एक आघाडीची कंपनी असून ती व्हिसा आणि कॉन्सुलर सेवांमध्ये तज्ञ आहे आणि त्यामुळे बीएलएसच्या विस्तार करण्याच्या योजनांमध्ये धोरणात्मक भर पडेल.

बीएलएस इंटरनॅशनल सर्व्हिसेस लिमिटेडचे सह महा-व्यवस्थापकीय संचालक शिखर अग्रवाल म्हणाले की, “बीएलएस इंटरनॅशनलच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून आयडेटा आणि तिच्या सहयोगी कंपन्यांचे संपादन जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. हे पाऊल सरकार आणि लोकांसाठी तंत्रज्ञानाने सक्षम सेवांमध्ये जागतिक आघाडी घेण्याची आमची वचनबद्धता अधोरेखित करते. हे संपादन केवळ आमच्या कार्यान्वयनाचा विस्तार करत नाही तर विविध देशांच्या सरकारांसोबत कायमस्वरूपी संबंध निर्माणाचे आमचे स्वप्न साकार करेल. आम्ही हा व्यवहार पूर्ण होण्याची आतुरतेने वाट पाहत आहोत, कारण ते जगभरातील सरकारांच्या अत्यावश्यक कामांसाठी मदत करून विश्वासार्हतापारदर्शकता आणि कार्यक्षमता या आमच्या तत्वांचे प्रतीक ठरेल.  

तुर्कीमध्ये स्थापन झालेली आयडेटा विविध सरकारांना सर्वसमावेशक व्हिसा सेवा आणि कॉन्सुलर सेवा प्रदान करते. कंपनीची सध्या १५+ देशांमध्ये ३७ पेक्षा जास्त व्हिसा अर्ज केंद्रे (व्हीएसी) आहेत आणि ती जर्मनीइटली आणि झेक प्रजासत्ताकच्या राजनैतिक कॅम्पेन्समध्ये देखील सेवा देते. मुख्य म्हणजे आयडेटा २००६ पासून इटलीच्या आणि २०१२ पासून जर्मन सरकारच्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशांमध्ये राजनैतिक मोहिमांसाठी व्हिसा आणि कॉन्सुलर सेवा देणारी एकमेव कंपनी आहे. २०२२ या वर्षात लेखा परीक्षण केलेल्या एकत्रित आर्थिक अहवालानुसारआयडेटाने १९.९ दशलक्ष युरो (~१८० कोटी रूपये) महसूल आणि १०.४ दशलक्ष युरो (~९४ कोटी रूपये) ईबीआयटीडीए प्राप्त केला आहे. 

संपादनासाठीचा निधी प्रामुख्याने आमच्या स्वतःच्या जमा रकमांमधून दिला जाईल. तसेच व्यवहार सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून ईपीएस दिला जाईल आणि तो याच आर्थिक वर्षातसरकार आणि नियामक मंजूरींच्या सापेक्ष पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

प्राइसवॉटरहाऊसकूपर्स (पीडब्ल्यूसी) तुर्की आणि लॅगरेंज पॉइंट अॅडव्हायझर्स एलएलपीमुंबई यांनी संयुक्तरित्या या व्यवहारात बीएलएसचे व्यवहार सल्लागार म्हणून काम केले आहे. डेन्टॉन लिंक लीगल इंडिया आणि बाल्सिग्लू सेलुक आर्डियोक केकी एटॉर्नी पार्टनरशिप (बेसीक)तुर्की यांनी या व्यवहारासाठी कायदेशीर सल्लागार म्हणून काम केले.  

Post a Comment

Previous Post Next Post