दिवा (आरती मुळीक परब) : दिवा शहरातील शिवसेनेच्या युवा शाखाप्रमुख चंद्रसेन यादव यांनी काल स्वतःच्या वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात साजरा झाला. त्यावेळी त्यांनी ४५० ते ५०० नागरिकांना अन्नदान करण्यात आले. उत्तर भारतीयांपैकी असणारा हा हसतमुख चेहरा, समाजसेवक व इमारत व्यावसायिक तसेच शिवसेना दिवा उपशहर प्रमुख आणि नगरसेवक शैलेश पाटील यांचे कट्टर समर्थक असणारे चंद्रसेन यादव मनमिळाऊ स्वभावाचे असून ते सर्वांच्या मदतीला तत्पर असतात.
दिवा शहराच्या साबेगावातील डी. जे. कॉम्प्लेक्स येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात शेकडो मित्र मंडळी, नातेवाईक व मान्यवरांनी त्यांच्या वाढदिवसाला हजेरी लावत शुभेच्छा दिल्या. तसेच त्या भागातील राहणाऱ्या नागरिकांना आणि आलेल्या पाहुण्यांना यादव यांच्याकडून व्हेज आणि नॉनव्हेज जेवण देण्यात आले.