डोंबिवली ( शंकर जाधव ) : पर्यावरण दक्षता मंडळ आणि एन्व्हायरो व्हिजिल यांच्या संयुक्त विद्यमाने शांतीनगर विद्यालय,प्राथमिक विभाग,डोंबिवली (पूर्व) येथे नैसर्गिक रंग निर्मिती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.निसर्गातील पाने,फुले,भाज्या, फळे यां पासून पर्यावरण पूरक रंग कसे तयार करावेत याचे प्रात्यक्षिक मुलांना दाखविण्यात आले.
बाजारातील रंग कसे तयार करतात, ते त्वचेसाठी कसे घातक असतात हे पॉवरपॉइंट प्रेझेन्टेशन द्वारे मुलांना समजावून सांगितले.होळी कशी व का साजरी करतात, त्यात कोणत्या झाडांची लाकडे जाळतात व का जाळतात याचे वैज्ञानिक विश्लेषण करण्यात आले. पाण्याची बचत आणि पर्यावरण पुरक होळी का आणि साजरी करावी याचे मार्गदर्शन मुलांना करण्यात आले.पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धनासाठी स्तुत्य अशी ही कार्यशाळा होती.