वीटभट्टीवरील वंचित मुलांची अनोखी होळी

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) :  कल्याणच्या वाडेघर परिसरात वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी अनुबंध संस्थेने पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्यात आली. वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारांची पूर्ण ऊर्जा मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठीच निघून जाते. 

कल्याणातील वंचित मुलांसाठी गेल्या दशकभरापासून कार्यरत असलेल्या अनुबंध संस्थेतर्फे कल्याण पश्चिमेच्या वाडेघर परिसरात असलेल्या आमणे पाडा येथील वीटभट्टीवर पर्यावरणाचे भान राखत सुरक्षित सुके रंग वापरून ही पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली.  अतिशय बेरंग आयुष्य जगणाऱ्या या चिमुरड्यांच्या चेहऱ्यावर सप्तरंगी आनंद फुलवला. अनुबंध संस्थेचे सूर्यकांत कोळी आणि प्रभाकर घुले यांनी हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.



Post a Comment

Previous Post Next Post