ज्ञानमंदिर विद्यासंकुल मधील विद्यार्थिनी घेतली शपथ
डोंबिवली ( शंकर जाधव ) : ज्ञानमंदिर विद्यासंकुल के. रा. कोतकर विद्यालय इ.८ वी च्या विद्यार्थ्यासाठी पर्यावरण दक्षतामंचने नैसर्गिक रंगाची कार्यशाळा घेण्यात आली.
विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी कांद्याची साले पालक, बीट ,हळद, झेंडूची फुले इत्यादी नैसर्गिक घटकांचा वापर करण्यात आला.
आदित्य व रूपाली शाहीवाले यांनी रंग कसे तयार करायचे त्याचे प्रात्यक्षिक दाखविले व प्रत्येक विद्यार्थ्याकडून नैसर्गिक रंग तयार करून घेतले. यंदाची होळी विद्यार्थी नैसर्गिक रंगाने साजरी करणार अशी शपथ घेतली.या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका संगीता पाखले, सोमवंशी, तडवी यांनी केले.