नो पार्किंगमधील वाहनांवर कारवाई नाही
डोंबिवली ( शंकर जाधव ) : स्टेशनबाहेरील अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिका प्रशासनाने कारवाई करत माल जप्त केला. ' ग' प्रभाग क्षेत्र सहायक आयुक्त संजय कुमावत आणि किशोर ठाकूर यांच्या नियंत्रणाखाली कारवाईत मधूबन गल्ली, उर्सेकवाडी, रामनगर तिकीट बाहेरील परीसर, केळकर रोड,स्टेशन बाहेरील परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई झाली. दुकानदारांनी फुटपाथवर अतिक्रमण करत ठेवलेलं सामान पथक कर्मचाऱ्यांनी जप्त केले. या कारवाईने फुथपावर मोकळे झाल्याचे पाहून पालिका प्रशासनाचे आभार मानले.
अनधिकृत शेडही तोडण्यात आल्याने नागरीक खुश झाले होते. तर या कारवाईत पालिकेने सातत्य ठेवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.तसेच नागरिकांसाठी चालण्यासाठी राखीव जागा म्हणजे फुटपाथवर अनेक वर्षोपासून अतिक्रमण केले आहे.कारवाई झाल्यानंतर काही दिवस फुटपाथ मोकळे दिसतात.मात्र काही दिवसानंतर पुन्हा फुटपाथवर समान ठेवले जाते. फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तसेच स्टेशनबाहेरील नो पार्किंग मध्ये दुचाकी व चारचाकी वाहनांवर वाहतूक पोलीस कारवाई होत नसल्याने वाहतूक कोंडी होत असते.