पोलीस ठाण्यात तक्रार
डोंबिवली ( शंकर जाधव ) : अंगावर कचरा का टाकला असे विचारल्यावर नागरिकाला १५ ते २० फेरीवाल्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना सोमवार २५ तारखेला सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनबाहेरील परिसरात घडली. या प्रकरणी मारहाण झालेल्या नागरिकाने डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
शुभम ठाकूर असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. सांगावं येथील राहणारा हा तरुण सोमवारी डोंबिवली स्टेशनला उतरल्यावर स्टेशन बाहेर आल्यावर त्याच्या अंगावर फेरीवाल्यांनी कचरा टाकला. याचा जाब शुभमने विचारला असता १० ते १५ फेरीवाल्यांनी बेदम मारहाण केली. घाबरलेल्या तरुणाने मारहाण करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.