सेन्सेक्स ५०० अंकांनी वधारला
निफ्टीचा २२,१५० चा टप्पा पार
मुंबई : जागतिक बाजारात चढ-उतार सुरू असताना रिलायन्स इंडस्ट्रीज आणि वित्तीय समभागांच्या मजबूत कामगिरीमुळे बुधवारी भारतीय शेअर बाजार वर चढलेला दिसला. भारतीय शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स सकाळी ५०० अंकांच्या वाढीसह ७२,९७६ अंकांवर, तर निफ्टी ५० अंकांच्या वाढीसह २२,१५० अंकांवर उंचावलेला दिसला.
सेन्सेक्स समभागांमध्ये, मारुती सुझुकी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज १% पेक्षा जास्त वाढ दर्शवत सर्वाधिक वाढले. ॲक्सिस बँक, बजाज फायनान्स, एचयूएल एल अँड टी आणि टाटा मोटर्स देखील वाढीसह उघडले, तर विप्रो, जेएसडब्ल्यू स्टील, इन्फोसिस आणि नेस्ले इंडिया तोट्यासह व्यवहार करताना दिसले.
एका अहवालानंतर सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (CDSL) चे शेअर्स ६.४% घसरले. अहवालानुसार, स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने कंपनीतील आपला संपूर्ण ७.१८% हिस्सा ब्लॉक डीलद्वारे विकला आहे. लॅन्को अमरकंटक पॉवरच्या १००% इक्विटी शेअर भांडवलाच्या प्रस्तावित अधिग्रहणास भारतीय स्पर्धा आयोगाने मान्यता दिल्यानंतर अदानी पॉवरचे शेअर्स ४% पेक्षा जास्त पटीने वाढले.
क्षेत्रानुसार, निफ्टी ऑइल अँड गॅस १.६% आणि निफ्टी मेड्स १.३% वाढले. निफ्टी ऑटो, बँक, फायनान्शिअल, एफएमसीजी, मेटल आणि रियल्टीमध्येही वाढ दिसून आली. दरम्यान, व्यापक बाजारपेठेत, निफ्टी स्मॉलकॅप १०० आणि मिडकॅप ०० अनुक्रमे ०.७% आणि ०.५% च्या वाढीवर थांबले.