चार दिवसात होणार सभा
डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारार्थ सोमवार १३ मे रोजी सायंकाळी ५ वाजता डोंबिवली पश्चिमेकडील कान्होजी ( भागशाळा ) जेधे मैदान येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित केली. मात्र दुपारच्या सुमारास अवकाळी पावस पडल्याने सभा रद्द करण्यात आली.
सभेच्या ठिकाणची व्यवस्था पाहण्यासाठी ठाकरे गटातील गुरुनाथ खोत, वरून सरदेसाई, कल्याण जिल्हाप्रमुखं सदानंद थरवळ यांसह पदाधिकारी आले होते.यावेळी वरून सरदेसाई म्हणाले, सभेची सर्व तयारी झाली असताना अचानक मुसळधार पाऊस पडल्याने जाहीर सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणात व्यक्तय येऊ नये व हजारो नागरिकांना त्रास होऊ नये ही सभा रद्द करण्यात आली होती.तर उमेदवार वैशाली दरेकर म्हणाल्या, चार- पाच दिवसात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची डोंबिवलीत सभा होईल.
