बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना'

 




जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांचा शेकापचे जयंत पाटील यांच्यावर घणाघाती प्रहार

अलिबाग, (धनंजय कवठेकर) : 'बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना' असे निर्भिडपणाचे वक्तव्य करून शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी शेकापचे जयंत पाटील यांच्यावर चोंढी येथे आयोजित ३२ लोकसभा रायगड मतदार संघ मापगाव मतदार संघ महायुती आढावा बैठकीत सूनिलजी तटकरे यांच्या प्रचार सभेत बोलताना चांगलाच घणाघाती प्रहार केला आहे. 

सूनिलजी तटकरे यांना महायुतीचे उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर जिल्ह्यामध्ये युतीच्या माध्यमातून सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र येऊन तटकरे साहेबांना निवडून येण्याकरिता शर्तीचे प्रयत्न सुरू केले असल्याचेही ते यावेळी म्हणाले.अलिबाग तालुक्यावर शेकापचे वर्चस्व असून वर्षानुवर्षे सत्ता भोगत असताना शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळून स्वतः मात्र सुखासुखी जीवन जगत असताना अलिबाग, रायगड, खारेपाट, अलिबाग मुरुड मतदार संघांचा कोणत्याही प्रकारचा विकास शेकापने केला नाही मात्र केवळ वाडवडीलांच्या कार्यकर्तृत्वाचा आधार घेत लोकांची फसवणूक आणि दिशाभूल करण्याचा सहानुभूतीपूर्वक प्रयत्न करीत तमाम जनतेला वेठीस धरून, फसवणूक करून त्यांचा गैरफायदा घेत वर्षानुवर्षे आपले वर्चस्व टिकवून ठेवले. 


कित्येक वर्षे आरडीसी बँकेच्या माध्यमातून गरीब जनतेला व्याज, चक्रीवाढ व्याज यांच्यामध्ये गुरुफटून अगदी मेटाकुटीस आणून रस्त्यावर आणले, निवडणुकांमध्ये त्यांच्याच मालकीच्या बँक मधून कार्यकर्त्यांच्या नावात कर्ज काढून त्यांना कर्जबाजारी करून घरदार विकावयास भाग पाडले इतकेच नव्हे तर जिल्हापरिषद, आमदार, मंत्री हे सर्व शेकापच्या ताब्यात असताना देखील अलिबाग, मुरुड,खारेपाट, रायगड कुर्डूस, शहापूर या विभागांची पाहिजे तेवढी प्रगती शेकापने केली नाही कारण पाटील परिवार सत्तेच्या नावाखाली आणि शेतकरी कामगार पक्षाच्या नावाचा आधार घेऊन केवळ स्वतःचा विकास आणि प्रगती करण्यात व्यस्त होता.

 या विभागात अनेक प्रकारच्या कंपन्या येऊ पाहत असताना शेकापच्या नेतेमंडळीनी जनतेच्या दृष्टीने विचार न करता केवळ स्वार्थीपणाने विचार करून या विकास कामांना खो देण्याचे कार्य केले. खारेपाट मध्ये एअरपोर्ट आल्याने अनेक जणांना रोजगार मिळणार होता परंतु तिथे देखील जनतेला खोटी सहानुभूती दाखवून त्यांची दिशाभूल करून आपले अस्तित्व कमी होईल या भीतीपोटी हे प्रोजेक्ट परत पाठविले. शेतकऱ्यांच्या मुखी येणारा घास अलगद काढून खारेपाट विभागाला २५ वर्षे मागे नेण्याची शकुनी चाल शेकापने चालली अशा शब्दांत थेट प्रहार जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी जयंत पाटील यांच्यावर केला आहे.

 येत्या लोकसभा निवडणुकीत सुज्ञ नागरिक म्हणून विचारपूर्वक निर्णय घेऊन विकास कामे करून घ्यायची असतील तर आपला खासदार सुनीलजी तटकरे यांना त्यांच्या नावापुढे असणारे घड्याळाचे बटन दाबून मत द्यायचे व पुन्हा एकदा मोदी सरकारला निवडून द्यायचे असेही आवाहन त्यांनी तमाम जनतेला केले आहे. अनंत गीते खासदार असताना प्रत्येक वेळी त्यांनी अलिबाग तालुक्यात रेल्वे आणतो, विकासाची गंगा आणतो असे सांगून अलिबागकरांच्या तोंडाला मात्र प्रत्येक वेळी पाणी पुसून खोटी आश्वासने दिली आहेत. त्यामुळे जनतेला वेठीस धरणाऱ्या अनंत गीते यांच्या खोट्या भूलथापांना बळी न पडता, तमाम जनतेने एकत्र येवून या शेकापला नेस्तनाभूत करून त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी असे आवाहन जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी केले आहे.

 कोणतीही विकास कामे न करता शेकापने आपल्या दडपशाहीचा, हुकूमशाहीचा वापर करून जनतेचा आवाज दबवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे परंतु आता जनतेच्या हातात चावी आहे की शेकापला कुलूप बंद करून कायमचे नेस्तनाभूत करायचे की त्यांच्या हातात चावी देऊन त्यांना पुन्हा एकदा आपल्यावर अन्याय,अत्याचार, हुकूमशाही, दडपशाही करण्याची मुभा द्यायची? आज खारेपाटातील कुर्डूस शहापूर मतदार संघ शेतकऱ्यांची अवस्था अशी झाली आहे की तिथे प्रत्यक्ष जाऊन पाहिले तर दिसेल आज शेकापचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघांमधील लवकरच आजी माजी ९ सरपंच आणि १६ ग्रामपंचायत सदस्य शेकापच्या हुकूमशाही, दडपशाही व जुलूमाला कंटाळून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत याचा अर्थ शहापुर, कुर्डूस मतदारसंघाने संघनमताने एकत्र येत शेकापच्या विरोधात म्हणजेच अन्यायाविरोधात आवाज उठविला व शेकापची अवस्था '.....ना घर का, ना घाट का' अशी करून ठेवली आहे.

 त्यामुळे तमाम सुज्ञ जनतेला माझे जाहीरपणे आवाहन असणार आहे की, ७ मे रोजी सुनीलजी तटकरे यांच्या नावासमोरील घड्याळाच्या बटनाला दाबून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवून गरिबांच्या हिताचे, योग्यतेचे सरकार बनविण्यात तुमचे योगदान द्यायचे आहे आणि त्यासाठी गावागावातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी सुनिलजी तटकरे यांना जास्तीत जास्त मत मिळवून देण्यासाठी कोणताही अनुचित प्रकार न करता शर्तीचे प्रयत्न करण्याचे आवाहन रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी केले आहे.



Post a Comment

Previous Post Next Post