कल्याणममध्ये ८०० कोटींचा प्रकल्प राबविणार


खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या जाहीरनाम्यातील संकल्प पत्रात विकासकामांचा धडाका 

डोंबिवली ( शंकर जाधव ) : गेली दहा वर्ष कल्याण लोकसभा मतदारसंघात विकासकामे करून जनतेच्या मनातील खासदार अशी छाप पडलेल्या डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी खासदार डॉ. शिंदे यांना पत्र लिहून कामाचे कौतुक केले. यावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कौतुकाची थाप म्हणजे आणखी विकासकामे करण्यासाठी प्रोत्साहन असल्याचे बुधवारी डोंबिवली जिमखाना येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या जाहीरनाम्यातील संकल्प पत्र जाहीर करण्यात आले. संकल्प पत्रात विकासकामाचा धडाका असून यात सुखद रेल्वे प्रवास, आरोग्य, शाळा, रस्ते, मेट्रो, पार्किंग सुविधा यावर भर दिला असून आगामी काळात कल्याणममध्ये ८०० कोटींचा प्रकल्प राबविणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले.


    कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्प पत्राचे डोंबिवली जिमखाना येथे अनावरण करण्यात आले.यावेळी माजी खासदार आनंद परांजपे, युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, तालुका प्रमुख महेश पाटील, प्रकाश म्हात्रे, एकनाथ पाटील, भाजपा कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे, कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, माजी नगरसेवक मंदार हळबे, विकास म्हात्रे, शैलेश धात्रक, राहुल दामले, यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

   यावेळी माजी खासदार आनंद परांजपे यांनी डॉ. श्रीकांत शिंदे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. तर भाजप कल्याण जिल्हाअध्यक्ष नाना सूर्यवंशी यांनी विक्रमी मतांनी निवडून आणा असे आवाहन केले. मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांनीही खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या विकासकामाचे कौतुक केले.

   संकल्प पात्राची माहिती देताना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे म्हणाले, सर्व मतदारांचे धन्यवाद करतो की मला दोन निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून आणले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्य सरकाराच्या नेतृत्वाखाली विकासकामे केली. मंगळवारी पंतप्रधान मोदी यांनी सभा घेऊन मला जिंकून येण्याचा आशीर्वाद दिला. पंतप्रधान मोदी यांनी पत्र दिले आहे. हे पत्र माझ्यासाठी मोठी गोष्ट आले की मला या पत्रातून कामाबाबत कौतुकाची थाप दिली आहे. 



संकल्प पत्रात मी खासदार म्हणून कोणती विकास कामे करणार आहे त्यांची त्यांची माहिती दिली आहे. सहा हजार कोटीपेक्षा जास्त कामे रेल्वे व रोड वे वर केली आहे. मी माझ्या जाहीर नाम्यातील संकल्प पत्रात विकासकामांची माहिती देत असताना 

संकल्प पत्रातील महत्वाचे मुद्दे 

  •   कल्याण रेल्वे यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्प पूर्ण करून विमानतळाच्या धर्तीवर स्थानकात सुविधा.
  •    नव्या लोकल आणि एक्सप्रेक्स गाड्या सुरु करण्याची संधी
  •   मतदार संघातल्या प्रत्येक रेल्वे स्थानकात ट्रॉमा सेंटर उभारणार..
  •    दिवा-सीएसएमटी ट्रमिनस अशी नवी लोकल सुरु करणार..
  •   सीएसएमटी ते पनवेल अशी दिवा मार्गे लोकल सेवा सुरु करणार..
  •   लोकल मध्ये स्टुडन्ट कोचं करणार...
  •   दिवा सावंतवाडी गाडीच्या फेऱ्या वाढविण्यासाठी प्रयत्न..
  •   मतदार संघात सेंट्रलाईज ब्लड बँक उभारणार..
  •   मतदारसंघात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याची संख्या वाढवणार..
  •   डोंबिवलीतील सूतिकागृह आणि कॅन्सर रुग्णालय लवकर सुरु होणार..
  •   प्रत्येक शहरात दृष्टीहीन व दिव्यांग भवनाची उभारणी करणार.. दिव्यांगासाठी स्वतंत्र शिधापत्रिका देण्यासाठी प्रयत्न..
  •   महिलांना सक्षमीकरणासाठी महिला व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र उभारणार..
  •   पालिका शाळेत दर्जेदार शिक्षण.. जिल्हा परिषदेच्या शाळांना स्मार्ट शाळांमध्ये रूपांतर..
  •   अंतार्ली येथे महाहबच्या माध्यमातून प्रशिक्षण, संशोधन, स्टार्ट अपच्या उभारणीसाठी तरुण उद्योजकांना मदत मिळणार..
  •    मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार..
  •   नाट्य कलावतांना तालीम करण्यासाठी मॅच उपलब्ध करून देणार..
  •   उल्हासनगरमधील धोकादायक आणि अनधिकृत इमारती आणि बांधकांमाना संरक्षण..
  •   प्रकल्पग्रस्ताना आवास योजने तील घरे देणार..
  •   झोपडपट्टीमुक्ती शहरे उभारणीसाठी प्रयत्न करणार..
  •   पुण्यातील बालेवाडीच्या धर्तीवर स्पोर्ट्स अकॅडमी उभारणार..
  •    उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, दिवा, कळवा मध्ये खुले आणि बंदिस्त क्रीडा संकुलांचे काम वेगाने पूर्ण करणार..
  •   ग्रामीण भागातील रस्ते, पाणी पुरवठा, प्राथमिक आरोग्य, शिक्षण या सुविधासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला असून त्यासाठी आणखी निधी देणार..
  •    ग्रामीण भागातील पाणी योजना, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापण,सांडपाणी व्यवस्थापणाचे प्रकल्प सुरु करणार..
  •   मुंब्रा देवी देवस्थान, कल्याणचे तिसाई देवी देवस्थान शक्तीपीठ म्हणून विकसित करणार..
  •    आगरी कोळी आणि वारकरी बांधकामाचा इतिहास जगाला कळवा यासाठी स्वतंत्र भवन उभारले जाणार..
  •   कचोरे टेकडी आणि उंबार्ली टेकडीवर नेचर पार्क उभारणार..
  •    मतदार संघातील अस्तित्वात असलेल्या उद्यानांचा पूर्णविकास करणार..
  •   कुशीवली धरणाचे काम पूर्ण करणार..
  •    काळू आणि पोशीर धरणाच्या कामाला गती देण्यासाठी प्रयत्न..
  •    केंद्र सरकारच्या 'हर घर जल' मोहीमे अंतर्गत प्रत्येक घरात मुबलक पाण्याचा पुरवठा करण्यासाठी सुरु असलेल्या नियोजनाचे दृश्ये परिणाम पुढील काही वर्षात दिसणार.  
  •    सांडपाणीवर तिहीर प्रक्रिया करून त्याचा पिण्यासाठी वगळता इतर कामांसाठी पुनवापर करण्याचा प्रयत्न..

Post a Comment

Previous Post Next Post