हैदराबाद: येथील मुघलपुरा येथील बीबी बाजार रोडवर रविवारी दुपारी दुचाकीचा स्फोट होऊन सुमारे १० जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. रस्त्याच्या मधोमध हा स्फोट झाल्याने पोलीस हवालदारासह १० जण गंभीर जखमी झाले आहेत. हा स्फोट रॉयल एनफिल्ड या दुचाकीचा झाल्याचे समोर आले आहे.
रविवारी दुपारी एक व्यक्ती रॉयल एनफिल्ड दुचाकीवरून बिवी बाजार येथे पोहोचताच अचानक त्याच्या दुचाकीने पेट घेतला. दुचाकीवरून उडी मारून दुचाकीस्वाराने स्वतःचा जीव वाचवला. मात्र, घटना घडली त्यावेळी परिसरात उपस्थित असलेल्या लोकांनी मदतीसाठी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला.
आग विझवण्याचा प्रयत्न करत असताना बाईकमधून मोठ्या आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. काही वेळानंतर दुचाकीचा अचानक स्फोट झाला आणि आजूबाजूला उभ्या असलेल्या दुचाकीला आग लागली आणि ते जीव वाचवण्यासाठी धावू लागले.
स्फोट इतका तीव्र होता की काही लोक हवेत फेकले गेले आणि ज्या ठिकाणी स्फोट झाला तेथून काही फूट अंतरावर पडले. या घटनेत दहाहून अधिक जण भाजले असून त्यांना प्रिन्सेस इसरा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
.jpeg)
.jpeg)