सध्या उन्हाळा आणि सुट्ट्या यांचे समीकरण चांगलेच जुळून आले आहे. त्यात दिवसभर राजकीय बातम्या यातून चांगले मनोरंजन होण्यासाठी OTT प्लॅटफॉर्मचा उत्तम पर्याय आहे. ह्या महिन्यात अनेक नवीन रिलीझ आणि वेब सिरीज येणार असल्यामुळे तुम्ही तुमचा वीकेंड पूर्ण मनोरंजन करू शकता.
१-शैतान
'शैतान' नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. हा चित्रपट गुजराती चित्रपट 'वश'चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाची कथा एका सुखी कुटुंबाची आहे ज्याचे जीवन एका रहस्यमय माणसाच्या आगमनानंतर विस्कळीत होते. चित्रपटात आर माधवनने सैतानाची भूमिका साकारली आहे आणि अजय देवगण एका बापाची भूमिका साकारत आहे ज्याच्या मुलीला सैतान शक्तीने आपल्या ताब्यात घेतले आहे.
२-हीरामंडी
संजय लीला भन्साळी वेब सीरिज ओबीसी प्लॅटफॉर्मवर हीरामंडीच्या माध्यमातून प्रवेश करत आहेत. सध्या त्यांची वेब सीरिज नेटफ्लिक्सवर चांगलीच ट्रेंड करत आहे. या मालिकेत मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, संजीदा शेख, शर्मीन सहगल आणि ताहा शाह बदुशा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
३-मंजुम्मेल बॉईज
हिट मल्याळम ड्रामा ‘मंजुम्मेल बॉईज’ OTT वर प्रसारित होत आहे. मित्रांच्या गटावर आधारित ही कथा आहे. तुम्ही ते OTT प्लॅटफॉर्म Disney Hotstar वर पाहू शकता.
४ - द आयडिया ऑफ यू (The Idea of You)
‘द आयडिया ऑफ यू’ हा चित्रपट ॲमेझॉन प्राइमवर प्रसारित होत आहे. हा रोमँटिक चित्रपट ४० वर्षीय घटस्फोटित आणि सिल्व्हर लेक आर्ट गॅलरीच्या मालकाची कथा सांगते. जो एका २४ वर्षाच्या मुलाच्या प्रेमात पडतो.
